Friday, April 26, 2024
Homeजळगावविद्यार्थ्यांना ऑनलाइनसह ऑफलाइनचा पर्याय

विद्यार्थ्यांना ऑनलाइनसह ऑफलाइनचा पर्याय

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या अंतिम वर्ष पदवी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सोबतच विद्यार्थ्यांना…

- Advertisement -

अपवादात्मक परिस्थितीतच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देता येईल. परंत,ु विद्यार्थ्यांनी विकल्प अर्ज भरतांना सविस्तर परीपूर्ण माहिती विद्यापिठाच्या संकेतस्थळावरून आपल्या लॉगइन आयडीतून विकल्प अर्ज भरता येईल,अशी माहिती विद्यापिठ सूत्रांनी दिली.

कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग विषयांसह प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने केले जाणार असून या लेखी परीक्षा वस्तूनिष्ठ स्वरूपात बहूपर्यायी असणार आहे.

जिल्हयाच्या मुख्यालयी तसेच अनेक ठिकाणी असलेल्या महाविद्यालयात विद्यार्थी बाहेर गावाहून शिक्षणासाठी येतात. ऑफ लाईन विकल्प भरतांना स्थायिनक पातळीवर देखिल महाविद्यालयस्तर परीक्षा देता येईल. दि. 15 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील व 1 ऑक्टोबर पासून लेखी परीक्षा होऊन 31 ऑक्टोबर पर्यंत निकाल जाहीर करण्यात येतील.

राज्य शासन निर्देशानुसार विद्यापीठाने स्थानिक पातळीवर परीक्षा आयोजन व वेळापत्रक निश्चित करण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीच्या शिफारस अहवालानुसार सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने व वस्तूनिष्ठ स्वरूपात बहूपर्यायी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पदवीसाठी 60 गुणांसह परीक्षा कालावधी 90 मिनिटांचा तर पदव्युत्तर परीक्षा 60 गुणांसह 120 मिनिटांचा कालावधीनुसार परीक्षा असेल. प्रत्येक प्रश्नाला एक गुण राहील. प्रात्यक्षिक परीक्षा 15 सप्टेंबर पासून सुरु होतील. संकेतस्थळावर परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या