टाळ-मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांची दिंडी

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

विद्या प्रबोधिनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत(Vidya Prabodhini in English medium school) आषाढी एकादशी ( Aashadhi Ekadashi ) निमित्त विविध घोषवाक्यांच्याद्वारे पर्यावरण रक्षण, स्वच्छ परिसर, संस्कृती रक्षण, स्त्री शक्ती जागर आदी सामाजिक विषयांवरील प्रबोधन करण्यात आले.यावेळी विठ्ठल- रखुमाई,विविध संत आणि वारकऱ्यांच्या वेशात विद्यार्थी सजले होते.

दिंड्या पताकांनी जणू काही शाळेत पंढरी सजली होती .यावेळी मुख्याध्यापिका डॉ.अंजली सक्सेना यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील विद्यार्थ्यांची पूजा केली. या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात हरिनामाचा जयघोष करत दिंडी काढली. संपूर्ण परिसर ‘जय हरी विठ्ठल’ गजरात दुमदुमला. विद्यार्थिनींनी नऊवारी साड्या परिधान करून पारंपारिक झांज नृत्य सादर केले. विठ्ठलाचे विविध अभंग सादर केले.

यावेळी उपमुख्याध्यापिका जयसुधा नायडू, पर्यवेक्षिका प्रियंका भट , क्रीडाशिक्षक अनिल दुसाने यांच्या मार्गदर्शनाने त्याचप्रमाणे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने शालेय पंढरीच्या रूपाने पांडुरंग चरणी सेवा अर्पण केली गेली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *