Thursday, April 25, 2024
Homeनगरपाच महिन्यांपासून विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित

पाच महिन्यांपासून विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पाच महिन्यांपासून जिल्ह्यातील विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित आहेत. पाठपुरावा करूनही शिक्षणाधिकारी पोषण आहार

- Advertisement -

विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत नसल्याने जिल्हा परिषदेतील भाजप गट नेते जालिंदर वाकचौरे यांनी मंगळवारी शिक्षणाधिकारी प्राथमिक शिवाजी शिंदे यांना पोषण आहार देऊन गांधीगिरी केली. यावेळी अशोक खेडकर, सोमीनाथ पाचारणे आदी उपस्थित होते.

शिक्षण विभागाचे दुर्लक्ष आणि अधिकार्‍यांच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी पाच महिन्यांपासून पोषण आहारापासून वंचित आहेत. खरंतर करोनाच्या काळात आठ-नऊ महिने शाळा बंद होत्या. त्याकाळात पोषण आहार वाटला असे कागदावर दिसते. परंतु प्रत्यक्षात तो वाटला की नाही याची चौकशी झाली पाहिजे. आता पाच महिने झाले पाचवी ते आठवी शाळा सुरू आहेत.

परंतु त्यांना पाच महिन्यांपासून पोषण आहार मिळत नाही. अधिकारी सांगतात ठेकेदारांची मुदत नोव्हेंबरला संपली. नोव्हेंबरला वाहतुकीच्या ठेकेदारांची मुदत संपणार होती, मग त्याचे नियोजन आधीच का केले नाही. नियमाने एक दिवस सुद्धा एकही विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित ठेवता येत नाही.

असे असताना विद्यार्थी पाच महिन्यांपासून वंचित राहिले, याला जबाबदार कोण व त्यांच्यावर काय कारवाई करणार ? गोर-गरिबांच्या मुलासाठी आलेला पोषण आहाराचा तांदूळ 107 मेट्रिक टन गोदामात पडून आहे. तो आता सडून जाईल, खराब होईल याला जबाबदार कोण, असा सवाल गटनेते वाकचौरे यांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्यात पहिली ते पाचवीचे 2 लाख 76 हजार 170 विद्यार्थी आहेत. तर सहावी ते आठवीचे 1 लाख 87 हजार 791 विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येतो. पोषणाची मागणी गटशिक्षणाधिकारी पातळीवरून होते. त्यानुसार तांदूळ, कडधान्य आणि दाळीचा पुरवठा होतो. आतापर्यंत शिक्षण उपसंचालक यांच्याशी पोषण आहार सुरू ठेवण्याबाबत अनेकदा पत्रव्यव्हार केला असल्याचे शिक्षणाधिकारी शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या