Thursday, April 25, 2024
HomeनाशिकNashik : आदिवासी आयुक्तालयासमोर विद्यार्थ्यांचे 'उलगुलान' आंदोलन

Nashik : आदिवासी आयुक्तालयासमोर विद्यार्थ्यांचे ‘उलगुलान’ आंदोलन

नाशिक | Nashik

आदिवासी विद्यार्थी,वस्तीगृहे आणि आश्रमशाळांच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने सोमवारी (दि.२३) रोजी येथील आदिवासी आयुक्तालयासमोर (Tribal Commissionerate) आंदोलन (agitaion) (उलगुलान) करण्यात आले…

- Advertisement -

आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थी तसेच आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप करत हे आंदोलन छेडण्यात आले होते.आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटीकडे झालेले दुर्लक्ष,सेंट्रल किचनचे निकृष्ट अन्न,अपुरी डीबीटी आणि विद्यार्थ्यांची मर्यादित क्षमता यासह विविध प्रश्नांवर हे आंदोलन करण्यात आले.

तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबरोबरच अनुसूचित क्षेत्रातील पदांची पेसा भरती करण्यात यावी, शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी,आदिवासी विभागाच्याच इंग्रजी शाळा असाव्यात, राज्यातील सेंट्रल किचन यंत्रणा बंद करण्यात यावी, आश्रम शाळांमध्येच पूर्वीप्रमाणे जेवण तयार करण्यात यावे, विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळावेत अशा विविध मागण्यांसाठी (Demands) हे आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, यावेळी अप्पर आयुक्त तुषार माळी (Tushar Mali) यांनी परिषदेच्या मागण्या येत्या १५ ते २० दिवसांत सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल,असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे (All India Tribal Development Council) लकी जाधव यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या