Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यागोदावरीत बोटिंग करताना विद्यार्थी बुडाला

गोदावरीत बोटिंग करताना विद्यार्थी बुडाला

निफाड | प्रतिनिधी

चांदोरी सायखेडा शहरातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी गोदावरी नदी पात्रात बुडाल्याची घटना आज (दि.०७) सकाळी घडली आहे…

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, आज सकाळी विद्यार्थी बुडाल्याची माहिती परिसरात समजताच . चांदोरी आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बुडालेल्या विद्यार्थ्याचा शोध घेण्यात येत आहे. रवींद्र बाळकृष्ण भोईर (20, रा. चाटोरी) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

तो सायखेडा येथील महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. तो चाटरी येथील रहिवासी असल्याचे समजते. घटनास्थळी चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथक कार्यरत असून सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस तसेच चांदोरीचे पोलीस पाटील अनिल गडाख, बाळू आंबेकर, अजय चारोस्कर, सोमनाथ कोटमे, मधुकर आवारे, संतोष लगड आदींचा या पथकात समावेश आहे.

विद्यार्थी हा गोदावरी नदीपात्रात बोटिंग करणारा प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहे. तो नदीपात्रात बोटींगचा सराव करीत होता ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या परिसरात सुमारे 50 फूट खोल गोदावरी नदीचे पाणी पातळी आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन पथकाने दिली आहे.

सकाळी 8.15 वाजेपासून आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून त्याचा नदीपात्रात शोध घेतला जात असून अद्याप शोध पथकाला यश आले नव्हते. या घटनेमुळे सायखेडा चाटोरी परिसरात शोककळा पसरली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या