Saturday, April 27, 2024
Homeनगरराज्यातील 74 लाख विद्यार्थ्यांचा डेटा जुळेना

राज्यातील 74 लाख विद्यार्थ्यांचा डेटा जुळेना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करून स्टुडंट पोर्टलवर माहिती अपडेट करणे शाळांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, शाळांकडून सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्राप्त झालेले नाहीत. त्यातच राज्यभरात तब्बल 73 लाख 80 हजार विद्यार्थ्यांची स्टुडंट पोर्टलवरील आधारविषयीचा डेटा जुळत नसल्याची बाब उघड झाली आहे. आधार अपडेशनची प्रक्रियाही पूर्ण झालेली नाही. आता विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीची वैधता तपासण्याची सुविधा शाळास्तरावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

- Advertisement -

शालेय पोषण आहार, आरटीई प्रवेश, शिष्यवृत्ती योजना, मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप यासह विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यात येतो. प्रत्येक योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांचा आधार संलग्नित मास्टर डेटाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या नोंदीनुसारच निधी वितरीत करण्यात येणार आहे.

यामुळे पात्र लाभार्थ्यांना योजनांचा पारदर्शकपणे लाभ घेता येणार आहे. शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये आधार प्रमाणे संबंधित विद्यार्थ्यांचे नाव असावे, अशी तरतूद आहे. वारंवार सूचना देऊनही विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्राप्त झालेले नाहीत. विद्यार्थ्याची आधार वैधता तपासणीत अधिक सुलभता यावी, यासाठी कार्यपध्दतीत सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वी एनआयसी मार्फत ही सुविधा उपलब्ध होती. मात्र, कामकाजासाठी खूप वेळ लागत असल्याने व शाळांना अपडेट लवकर समजत नव्हते. यामुळे आता शाळास्तरावर सुविधा सुरू करण्यात आली आहे.

शाळांकडून विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंद केल्यानंतर स्टुडंट पोर्टलवरील शाळेच्या रेकॉर्डवरील विद्यार्थ्याचे नाव, जन्म तारीख, लिंग ही माहिती तपासणे आवश्यक आहे. माहिती नोंद केल्यानंतर विद्यार्थ्यांचा डेटा आधार प्रमाणिकरणाकडून ऑनलाईन प्रमाणित करुन घेण्यात येतो. यात काही विद्यार्थ्यांचा डेटा जुळत नसल्याने हा डेटा आधार प्राधिकरणाकडून अवैध ठरविण्यात आला आहे. शाळांनी विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती व आधार कार्ड वरील माहिती जशी आहे तशी नोंद न करता चुका केल्यामुळे विद्यार्थ्यांंचे नोंद केलेले आधार अवैध ठरत आहेत.

राज्यातील आधार नोंदणीची सद्यस्थिती

एकूण विद्यार्थी 2 कोटी 13 लाख 79 हजार 258, आधार नोंदणी 2 कोटी 9 लाख 46 हजार 70, नोंदणी न केलेले 4 लाख 33 हजार 188, अपडेशन झालेले 1 कोटी 78 लाख 12 हजार 812, नोंदणी पात्र 1 कोटी 35 लाख 65 हजार 727, अपात्र 42 लाख 47 हजार 85, माहिती न जुळणे 31 लाख 33 हजार 258 आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या