Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरएसटी महामंडळाच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

एसटी महामंडळाच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासह अन्य मागण्यांसाठी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी सुरु केलेल्या संपामुळे ग्रामीण भागातील प्रवासी वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.

- Advertisement -

पुणतांबा येथे तर प्रवासी वर्गाला सध्या पूर्णपणे खासगी प्रवाशी वाहतूक करणार्‍या साधनांवर अवलंबून राहावे लागत आहे. पुणतांबा येथून कोपरगाव, शिर्डी, वैजापूर, श्रीरामपूर या ठिकाणी जाणार्‍या व येणार्‍या प्रवाशांची मोठी संख्या आहे. या चारही मार्गावर अंदाजे 45 ते 50 खासगी वाहने सध्या प्रवाशांची ने-आण करत आहे. राज्य ोसरकारने खासगी वाहनांना प्रवाशी वाहतूक करण्याची परवानगी दिल्यामुळे या वाहन चालकांची दिवाळी होत असली तरी खासगी वाहनाने प्रवास करणार्‍या प्रवासी वर्गाचे मात्र दिवाळे निघत आहे.

कारण खासगी वाहन चालकांवर सध्या तरी कोणाचेही नियत्रंण नाही. दिवाळीचा सण नुकताच संपला असला तरी भाऊबीजेनिमित महिला प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु आहे. मात्र एसटीच्या संपामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य व्यक्तींना सहन करावा लागत आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचार्‍यांच्या संपात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामीण भागातील प्रवासी वर्गातून पुढे येत आहे. संप चिघळला तर ग्रामीण भागातील प्रवासी वर्ग, विद्यार्थी वर्ग यांच्यात मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या