Wednesday, April 24, 2024
Homeधुळेतर जिल्ह्यात जनता कर्फ्यू ...

तर जिल्ह्यात जनता कर्फ्यू …

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या काही दिवसात करोना विषाणूच्या बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही चिंतेची बाब असून या विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी कंटेन्मेंट झोनची कठोर, प्रभावी, परिणामकारक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

त्यादृष्टीने स्थानिक स्वराज संस्था व आरोग्य विभागाने तातडीने कार्यवाही करावी. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना औषोधपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे तसेच नियमांचे उल्लखन करणार्‍यांवर कठोरपणे कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी आज दिले.

जिल्हयात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी सातपुडा सभागृहात तातडीची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकरी श्री. जगदाळे बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महापालिकेचे आयुक्त अजिज शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), कोरोनाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, महापालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, डॉ. महेश मोरे, डॉ. दीपक शेजवळ आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. जगदाळे म्हणाले की, धुळे महानगर क्षेत्राबरोबरच ग्रामीण भागातील रुग्ण संख्या देखील वाढत आहे. ही बाब गांर्भियाने घेण्याची आवश्यक आहे.

हीच परिस्थिती कायम राहिली, तर कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लवकरच जनता कर्फ्यू लागू करावा लागेल.

विवाह सोहळयावरील उपस्थितीची बंधने अधिक कठोर करण्यात येतील व लादण्यात येतील मंगल कार्यालयाची वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. त्यासाठी पथकांचे गठन करण्यात येईल.

यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नितीन बंग यांनी शहरातील विशेषता पेठ भागातील गर्दीवर नियंत्रणात आणण्यासाठी विविध सुचना केल्या. तसेच कोरोनावर नियंत्रण करणार्‍या प्रशासनाच्या प्रयत्नाला व्यापार्‍यांची पूर्णत: सहकार्य होते व राहिल.

व्यापारी संकुलात व्यापार्‍यांच्या संघटनेने नो मास्क् नो एन्ट्री, ही मोहीम कठोरतेने राबवयाची ग्वाही त्यांनी दिली. शिरपूर, साक्री, शिंदखेडा दोंडाईचा येथील मुख्याधिकार्‍यांनी ग्रामीण भागात पसरणार्‍या करोनावर मात करण्यासाठी हॉकर्सचे नियोजन करणे व पथके वाढविणे यावर बैठकीत चर्चा केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या