Friday, April 26, 2024
Homeजळगावलिंकिंग करणार्‍या कृषी केंद्र चालकांवर कठोर कारवाई

लिंकिंग करणार्‍या कृषी केंद्र चालकांवर कठोर कारवाई

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

काही कृषी केंद्र चालक लिंकींगच्या माध्यमातून शेतकर्‍यांची लुबाडणूक करत असल्याची चर्चा असून अशा चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शुक्रवारी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिला. शासकीय भरड धान्य खरेदीस चिंचोली व म्हसावद येथे ना. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

- Advertisement -

चिंचोली येथे जिल्हा कृषी औद्योगिक सेवा सह.संस्थेमार्फत तर म्हसावद येथे शेतकी संघामार्फत रब्बी भरड धान्य खरेदी योजनेस प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त पालकमंत्र्यांच्याहस्ते काटा पूजन करून आजपासून धान्य खरेदी सुरू करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन शैलजादेवी निकम होत्या. पालकमंत्र्यांनी काटा पूजन करून धान्य विक्रीसाठी आलेल्या शेतकर्‍यांना पेढा भरवून त्यांचा सत्कार केला.

यावेळी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, तहसीलदार नामदेव पाटील, संस्थेचे चेअरमन शैलजादेवी निकम, अजबराव पाटील, नियोजन समितीचे सदस्य तथा संचालक वाल्मिक पाटील, व्हा.चेअरमन संजीव पाटील, रवी कापडने, संचालक रमेश पाटील, अर्जुन पाटील, अनिल भोळे, ऋतेश निकम, सरपंच गोविंद पवार, समाधान चिंचोरे,विजय आमले,व्यवस्थापक व्ही.पी. पाटील, दीपक पाटील, सेवानिवृत्त डीएमओ एस. पी. माळी, अनिल पाटील, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सूत्रसंचालन रमेश पाटील यांनी तर आभार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाल्मिक पाटील यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या