Wednesday, April 24, 2024
Homeनगरपथदिव्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; महिनाभरातच पडले बंद

पथदिव्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; महिनाभरातच पडले बंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महानगरपालिकेच्यावतीने शहरात खासगी ठेकेदारामार्फत लावण्यात आलेले पथदिवे वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. शहरात सर्वत्र स्मार्ट एलईडी बसवण्याचे काम प्रगतीपथावर असताना लावलेले पथदिवेही महिनाभरात बंद पडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या पथदिव्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

- Advertisement -

नगर शहरात ठेकेदारामार्फत अद्यापपर्यंत सुमारे 30 हजार पथदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, बसविण्यात आलेल्या पथदिव्यांची तांत्रिक तपासणी अद्यापही झालेली नाही. त्यातच बसवण्यात आलेले पथदिवे महिना-दीड महिन्यातच बंद पडत आहेत. लालटाकी परिसर, जिल्हा रूग्णालयासमोरील नव्याने लावलेले पथदिवे सध्या बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या पथदिव्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

करारनाम्यातील अटी शर्तीनुसार कामावर नियंत्रण व तपासण्यासाठी अद्यापही त्रयस्थ संस्थेची नियुक्ती झालेली नाही. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, महापालिकेने बसवलेल्या एलईडीमुळे विजेची किती बचत झाली, हेही अद्याप गुलदस्त्यातच आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या