Friday, April 26, 2024
Homeनगरविद्युत तार अंगावर पडल्याने 7 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू !

विद्युत तार अंगावर पडल्याने 7 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू !

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

वादळी वार्‍याने (Stormy Winds) विद्युत तार (Electric Wire) तुटून अंगावर पडल्याने सात वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू (Child Death) झाल्याची घटना संगमनेर (Sangamner) तालुक्यातील चंदनापुरी (Chandnapuri) येथे गुरुवार (ता.4) मे रोजी दुपारी दिड ते दोन वाजेच्या सुमारास घडली. अजित गोकुळ मेंगाळ असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

- Advertisement -

गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल करणारा मुलगा श्रीगोंद्यातून ताब्यात

याबाबत समजलेली माहिती अशी की, चंदनापुरी येथे माधव शंकर राहाणे हे राहात असून वेल्हाळे येथील गोकुळ मेंगाळ हे त्यांची शेती वाट्याने करत आहे. गुरूवारी दुपारी मेंगाळ यांचा चिमुकला अजित हा राहणे यांच्या घराच्या पाठीमागे खेळत होता. त्याच दरम्यान तुरळक अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) जोरदार वादळी वारेही (Stormy Winds) सुरू झाले. त्याच वेळी सुरू असलेल्या वादळी वार्‍याने (Stormy Winds) विजवाहक तार तुटून थेट अजित याच्या अंगावर पडली. शेजारीच असलेल्या काहींनी हे दृश्य पाहीले आणि जोरजोराने आरडा ओरड केली.

संगमनेरचे शासकीय विश्रामगृह बनले खासगी भोजनालय

काय झाले म्हणून पाहण्यासाठी अनेकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. घटनेची माहिती समजताच वायरमन गोकुळ कतारी, मनोज नेहे यांनीही रोहित्राच्या दिशेने धाव घेत प्रथम रोहित्र बंद केले. त्यानंतर विजवाहक तार बाजूला घेण्यात आली. लगेच अजित या चिमुकल्याला औषधोपचारांसाठी घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयात (Ghulewadi Rural Hospital) नेले होते. मात्र औषधोपचारापूर्वीच त्याचा मृत्यू (Death) झाला असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान अजित गोकुळ मेंगाळ या सात वर्षीय चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

‘या’ नगरपालिकेचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात!

- Advertisment -

ताज्या बातम्या