Saturday, April 27, 2024
Homeनगरपुणतांब्याच्या ग्रामसभेत भ्रष्टाचारासह विविध विषयावर वादळी चर्चा

पुणतांब्याच्या ग्रामसभेत भ्रष्टाचारासह विविध विषयावर वादळी चर्चा

पुणतांबा | वार्ताहर

पुणतांबा (Puntamba) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये (ZP School) ग्रामपंचायत पुणतांबा (Puntamba Grampanchayat) यांनी आयोजित केलेल्या ग्रामसभेमध्ये (Gramsabha) सुलभ शौच्यालयासह विविध विषयांवर वादळी चर्चा झाली.

- Advertisement -

सुरुवातीस किशोर वहाडणे यांनी ग्रामसभेस शासकीय अधिकारी व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित का राहात नाही? असा प्रश्न केला. तसेच पुणतांबा गावाच्या लोकसंख्येच्या 25% जनता ग्राम सभेस उपस्थित असणे अवश्य आहे असेही त्यांनी सांगितले. पुणतांबा ग्रामपंचायतीने स्टेशन रोड व गावात गाळे बांधून ते फक्त स्थानिक लोकांना व स्थानिक व्यापाऱ्यांनाच व्यवसाय करण्यासाठी द्यावी अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली.

सुलभ शौचालय अंतर्गत काही ठिकाणी भ्रष्टाचार झाला असा आरोप वकील सुधीर नाईक यांनी केला. जिल्हा परिषदेची जागा बस स्थानकासाठी व गाळे धारकांसाठी वापरावी. तसेच वन्य जीव रानडुक्कर, हरिण, बिबट्या या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय योजना कराव्यात अशी सूचना सर्जेराव जाधव यांनी मांडली.

चांगदेव मंदिरासमोरील जागा, किंवा शेतकी महामंडळाची जागा स्मशान भूमी किंवा इतर गोष्टीसाठी देऊ नये अशी सूचना सुहासराव वहाडणे यांनी मांडली त्या सूचनेस गावकर्‍यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. सरपंच डॉ, धनवटे व ग्रामसेवक कडलक यांनी समर्पक उत्तरे दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या