Friday, April 26, 2024
Homeजळगावखरेदीसाठी बाजारपेेेठेत तुफान गर्दी

खरेदीसाठी बाजारपेेेठेत तुफान गर्दी

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

देशभरात दिपोत्सव (Dipotsav) मोठ्या उत्साहपुर्ण वातावरणात साजरा केला जात आहे. लक्ष्मीपुजन (Lakshmipujan) उद्यावर येवून ठेपले असल्याने लक्ष्मीपुजनासाठी लागणार्‍या साहित्यांची खरेदी करण्यासाठी (Purchase of materials) लक्ष्मीपुजनाच्या पुर्वसंध्येला बाजारपेठेत सकाळपासून तुफान गर्दी होत असल्याने बाजारपेठेत चैतन्य (Consciousness in the market) निर्माण झाले आहे.

- Advertisement -

सर्व सणांमध्ये महत्वाचा मानला जाणारा दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला असतो. गेल्या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र यंदा कोरोनाचे सावट मंदावले असल्याने प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मीपुजन उद्यावर येवून ठेपले असल्याने त्याच्या पुर्वसंध्येला बाजारपेठेत सकाळपासून लक्ष्मीपुजनाला लागणारी लक्ष्मींची मुर्ती, खतावणी, ऊस, कमळाचे फुल, केरसुरणी, झेंडूची फुले, लह्या बत्तासे व पुजेच्या साहित्यांसह यांसह मिठाईंची खरेदी करण्यासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. तसेच कपड्यांच्या दुकानात देखील प्रचंड गर्दी होत असल्याने दीड वर्षानंतर बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून आले.

कपड्यांच्या दुकानांत प्रचंड गर्दी

लक्ष्मीपुजनाला नवीन कपड्यांची खरेदी केली जात असल्याने बाजारपेठेत लहानग्यांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येक जण कपड्यांची खरेदी करीत आहे. त्यामुळे शहरातील कपड्यांच्या दुकानात खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत बाजारपेठ गजबजलेल्या दिसून आल्या.

मिठाईंचे दुकानेही गजबजले

लक्ष्मीपुजनाला प्रत्येक जण मिठाई घेवून जात असतो. दरम्यान लक्ष्मीपुजनाच्या दिवशी बाजारपेठेत प्रचंड गर्दी होत असल्याने लक्ष्मी पुजनाच्या पुर्वसंध्येला शहरातील मिठाई दुकाने देखील गजबजले दिसून आले.

उसाचा गोडवा महागला

लक्ष्मीपुजनाला पुजेसाठी उसाला फार महत्व आहे. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उस विक्रीसाठी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे. परंतु उसाच्या आकारानुसार त्याची विक्री केली जात असून 80 रुपये जोडी पासून ते 150 रुपयापर्यंत त्याची विक्री केली जात असल्याने उसाचा गोडवा महागल्याचे चित्र दिसून येत आहे.

झेंडूच्या फुलांचे दर आवाक्यात

यंदा क्षमतेपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र या पावसामुळे झेंडूच्या फुलांचे उत्पादन अधिक झाल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात झेंडूची फुले विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणली आहे. त्यामुळे यंदा झेंडूची फुले ही प्रति किलो 40 ते 60 रुपयांपर्यंत त्याची विक्री होत असल्याने यावर्षी झेंडूच्या फुलांचे दर आवाक्यात असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या