Wednesday, April 24, 2024
Homeनगर5 नंबर साठवण तलावाला निधी पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न सुटणार- पहाडे

5 नंबर साठवण तलावाला निधी पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न सुटणार- पहाडे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहराच्या विकासाच्या बाबतीत अनेक समस्या आणि अनेक प्रश्न प्रलंबित होते. त्यापैकी पिण्याच्या पाण्याचा अत्यंत महत्वाचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित होता. हा प्रश्न ना. आशुतोष काळे यांच्या भगीरथ प्रयत्नातून मार्गी लागला आहे. 5 नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी 131.24 कोटी निधीची प्रशासकीय मंजुरी मिळाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न कायमचा सुटणार असल्याचे कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मंदार पहाडे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

शहरातील नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्यामुळे शहराचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालला होता. पिण्याच्या पाण्याचे चारही साठवण तलाव शहरातील नागरिकांची तहान भागविण्यात असमर्थ ठरत होते. त्यामुळे आवर्तनकाळात पूर्ण क्षमतेने चारही तलाव भरलेले असतांना देखील पुढील आवर्तन येईपर्यंत कितीही पाणी जपून वापरले तरी पाण्याची टंचाई नागरिकांच्या पाचवीला पुजलेली होती. त्यामुळे कोपरगाव शहराला नियमित पाणी पुरवठा करायचा असेल तर अजून एका मोठ्या साठवण तलावाची गरज असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी नेमके हेरले होते.

त्यासाठी 5 नंबर साठवण तलाव होणे गरजेचे असल्यामुळे त्यादृष्टीने ना. काळे यांचा पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या पाठपुराव्याला महाविकास आघाडी सरकारने सकारात्मक प्रतिसाद देवून 5 नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी 131.24 कोटी निधीची प्रशासकीय मंजुरी दिली आहे. शहरातील नागरिकांच्या दृष्टीने हि अत्यंत दिलासा देणारी गोष्ट असून 5 नंबर साठवण तलावाच्या निर्मितीमुळे व वितरण व्यवस्था बदलण्यात येणार असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न कायमचा सुटणार असल्याचे मंदार पहाडे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या