Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारअक्कलकुवा येथे दगडफेक ; दुचाकीसह चार चाकी गाड्यांचे नुकसान

अक्कलकुवा येथे दगडफेक ; दुचाकीसह चार चाकी गाड्यांचे नुकसान

नंदूरबार l प्रतिनिधी nandurbar

आक्षेपार्ह व्हॉटसप स्टेटस (WhatsApp status) ठेवण्याच्या वादातुन अक्कलकुवा (Akkalkuwa) येथे काल रात्री तुफान दगडफेक करण्यात आली असून, दुचाकीसह, चार चाकी गाड्यांचेही मोठे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

अक्कलकुवा येथे आक्षेपार्ह व्हॉटसप स्टेटस ठेवण्याच्या वादातुन काल रात्री १२ वाजेनंतर तुफान दगडफेक करण्यात आली. (police) पोलीस स्टेशन मधुन परतत असतांना काही जणांनी केलेल्या दगडफेकीनंतर वातावरण चिघळले.

झेंडा चौक, बाजार पेठ, तळोदा नाका, मरीमता मंदिर परिसरात मोठे नुकसान झाले असून दुचाकीसह, चार चाकी गाड्यांचेही मोठे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अक्कलकुवा शहरात सध्या तणावपुर्ण शांतता असून पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी अक्कलकुव्यात दाखल झाले आहेत. पोलीस प्रशासनाकडून आरोपींचा शोध सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

पोलीस अधीक्षक आले ॲक्शन मोडवर, १५ संशयित आरोपींना अटक

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील रात्री पासून तळ ठोकून आहेत. दरम्यान या प्रकरणी १५ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

शहरात सध्या तणावपुर्ण शांतता असून पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी अक्कलकुव्यात दाखल झाले आहेत. पोलीस प्रशासनाकडून आरोपींचा शोध सुरु आहे.

जिल्ह्यात कुठलाही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. कायदा तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देत नागरिकांनी अफवांना बळी पडू नये असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या