Thursday, April 25, 2024
Homeजळगावसम्राट कॉलनीत पुन्हा दगडफेक

सम्राट कॉलनीत पुन्हा दगडफेक

जळगाव jalgaon

शहरातील सम्राट कॉलनी परिसरात (Samrat Colony area) धार्मिक स्थळावर (religious place) दगडफेक (stone throwing)केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. त्यामुळे परिसरात काहीवेळ तणाव निर्माण (create tension) झाला होता. एमआयडीसी पोलिसांनी (police) घटनांसाठी दाखल होऊन तणाव नियंत्रणात आणले दरम्यान रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण शांतता होती. पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली.

- Advertisement -

Big Breaking # 2000 रूपयांच्या नोटेबाबत आरबीआयने घेतला मोठा निर्णय… वाचाच अन्यथा होऊ शकते नुकसानजळगाव बाजार समिती सभापतीपदासाठी आज निवड

 शहरातील सम्राट कॉलनी परिसरात बुधवारी रात्री वाढदिवसाच्या केक कापण्याच्या कारणावरून काही तरुणांनी दगडफेक करून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच महामार्गाजवळील आज पुन्हा सम्राट कॉलनी परिसरातील एका धार्मिक स्थळावर शुक्रवारी १९ मे रोजी रात्री ९ वाजता काही तरुणांकडून दगडफेक केल्याची घटना घडली.

शस्त्रांसह दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाशवरणगाव फॅक्टरीत वाढत्या तापमानामुळे भीषण आग

या घटनेमुळे जळगाव शहर शहरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे साहेब फौजदार अतुल वंजारी पोलीस नाही इमरान सय्यद यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाल्यानंतर जमावाला पांगवापंगाव केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. 

दोन दिवसात फुकट्या प्रवाशांकडून दोन लाख 98 हजारांचा दंड वसुलVISUAL STORY : गळ्यात नको ते घालून उर्वशी रौतेलाने केला कहररेल्वे प्रवाशांनो हुतात्मा एक्सप्रेसने प्रवासाचे नियोजन करू नका… कारण..

एसीपीची घटनास्थळी पाहणी

सलग एकदिवसानंतर पुन्हा त्याच परिसरात काही टवाळखोरांनी दगडफेक केल्यामुळे परिसरात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेऊन टवाळखोरांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. 

जळगावचा पाणीपुरवठा नियोजित वेळेवरच होणार

- Advertisment -

ताज्या बातम्या