चोरीला गेलेला मुद्देमाल फिर्यादीला सुपूर्द

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केडगाव उपनगरातील (Kedgav) भूषणनगरमध्ये घरफोडी होऊन सुमारे दीड लाखांचे सोने-चांदीचे दागिने चोरीला (Gold and Silver Jewellery Theft) गेले होते. कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) या गुन्ह्याचा तपास करून आरोपीकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केला असून तो फिर्यादीकडे सुपूर्द केला.

श्रीरामपूरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकल्याचे लचके तोडले

भूषणनगर भागातील रहिवाशी पुजा मनोज बडे (रा. भूषणनगर) यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे गंठण, सोन्याची चैन, सोन्याची अंगठी, कलकत्ता पॅटर्नचे सोन्याचे कानातील टॉप्स, चांदीचे दागिने असा सुमारे दीड लाख रूयांचा ऐवज चोरीला (Theft) गेला होता. पोलीस निरीक्षक संपत शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली तपासी अधिकारी पोलीस नाईक मोहन भेटे आणि नकुल टोपरे यांनी या गुन्ह्याचा तपास करून अमोल बाबासाहेब जरे (वय 37 रा. रभाजीनगर, केडगाव) याला अटक केले.

गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून ग्रामविकास व पाणी बचतीचा संदेश द्यावा

त्याच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केला. न्यायालयाने हा मुद्देमाल फिर्यादी यांना देण्याचा आदेश केला होता. या आदेशानुसार पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या हस्ते बडे यांना सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने सुपूर्द करण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *