Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकचोरीच्या दुचाकी हस्तगत

चोरीच्या दुचाकी हस्तगत

जुने नाशिक | प्रतिनिधी

भद्रकाली पोलीसांच्या गुन्हे शोध व पोलिस उपायुक्त परिमंडळ 1 यांनी स्थापन केलेले अँण्टी मोटारसायकल थेप्ट पथकाने वेगवेगळ्या घटनेतील दोन संशयितांकडुन चोरीच्या २० दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या संदर्भातील पत्रकार परिषदेत उपायुक्त परिमंडळ १ किरणकुमार चव्हाण यांनी माहिती दिली.

- Advertisement -

५ डिसेंबर २२ रोजी वावरे लेन मेन रोड परिसरातुन फिर्यादी सुमित पेंढारी यांची दुचाकी चोरी गेली होती. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हे शोध पथक संशयितांचा शोध घेत होते. चोरी झालेल्या ठिकाणावरुन पथकांच्या धनजय हांसे, सागर निकुंभ यांनी वेगवेगळी वेशभुषा करत चौकशी करत होते.

यावेळी संशयित हेमंत रमेश सोनवणे (वय ३५ रा. फोपीर पावडदेव फाटा ता सटाणा जि नाशिक) या ठिकाणी वारंवार फिरत असतांना ताब्यात घेतले. गुन्हे शोध पथकाने त्यांच्याकडे चौकशी केली असता. वावरे लेन येथुन दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यांचे भद्रकाली हद्दीत ७ गुन्हे व सटाणा येथील १ गुुन्ह आहेत. ८ लाख ५ हजारांच्या १६ दुचाकी चोरीची ताब्यात घेण्यात आले आहेत. भद्रकाली पोलिसांनी संशयित सोनवणे ताब्यात घेत अधिक तपास भद्रकाली पोलीस करत आहेत. कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त दिपाली खन्ना, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे किशोर खांडवी, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, लक्षमण ठेपणे, रमेश कोळी, संदिप शेळके आदीच्या पथकाने केली.

दुसरी कारवाई परिमंडळ १ अँण्टी मोटारसायकल थेप्ट पथकांने एनडी पटेलरोड एसटी महामंडळाच्या कार्यालय समोरुन संशयित हबीब हनिफ शहा ( वय २३ रा. भारत नगर) यास पथकाने ताब्यात घेतले असता. पंचवटी २ व सरकार वाडा हद्दीतील ४ चोरी केलेल्या चार दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत सोनवणे, पोलिस नाईक प्रभाकर सोनवणे, पोलिस शिपाई संतोष पवार, पोलिस शिपाई अनिल आव्हाड, पोलिस शिपाई इरफान शेख, विश्वजीत राणे आदीच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या