Thursday, April 25, 2024
Homeधुळे22 वर्षापुर्वी चोरीस गेलेले पाऊण लाखांचे दागिणे परत मिळतात तेव्हा...

22 वर्षापुर्वी चोरीस गेलेले पाऊण लाखांचे दागिणे परत मिळतात तेव्हा…

धुळे Dhule। प्रतिनिधी

चोरीला गेलेले दागिने (Jewelry stolen) तब्बल 22 वर्षानंतर फिर्यादीला (plaintiff) पोलिसांनी (police) मिळवून दिले (Got it) आहे. सुमारे पाऊण लाख रुपये किंमतीचे हे दागिने मिळाल्यानंतर फिर्यादीने जिल्हा पोलिस प्रमुख (District Police Chief) प्रविणकुमार पाटील यांच्यासह पोलिस पथकाचे आभार (Thanks) मानले.

- Advertisement -

धुळ्यातील रहिवासी व सध्या सिडको कॉलनी मागे, नाशिक येथे वास्तव्याला असलेले निळकंठ हरी माळी (वय 69) यांच्याकडे 1995 मध्ये ते धुळ्यात असताना चोरी (Theft) झाली होती.चोरट्यांनी त्यांच्या घरातील 28 ग्रॅम वजनाचे दागिने चोरुन नेले (Jewelry stolen) होते. रमेश बाबुराव कटकेसह त्याच्या बारा साथीदारांनी ही चोरी केली होती. रमेश कटकेसह त्याच्या टोळीच्या धुळे तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत(Material seized) केला.

पोलिसांनी 58 हजार 729 रुपये किंमतीची 22 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड आणि 16 हजार 17 रुपये किंमतीची 6 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड या चोरट्यांकडून हस्तगत केली. पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी मुद्देमाल या गुन्ह्यातील फिर्यादी निळकंठ माळी यांना त्यांचे चोरीस गेलेले सोन्याचे दागिने परत (Return the gold jewelry) केले.

तब्बल 22 वर्षानंतर दागिने परत मिळाल्याने निळकंठ माळी यांनी पोेलिस अधिक्षकांसह पोलिसांचे कौतुक करून आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या