Friday, April 26, 2024
Homeजळगावसव्वा लाखांचा बनावट तंबाखूचा साठा जप्त

सव्वा लाखांचा बनावट तंबाखूचा साठा जप्त

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

शहरातील इच्छादेवी येथे कोरोना पार्श्वभूमिवर नाकाबंदी करण्यात आली आहे. याठिकाणी एमआयडीसी पोलिसांनी तपासणीत सव्वा लाखांचा तंबाखूचा साठा असलेले मालवाहू वाहन पकडले होते.

- Advertisement -

वाहनातील तंबाखुचा साठा हा बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आज 22 फेब्रुवारी रोजी याप्रकरणी आर.के.पटेल या तंबाखूच्या कंपनीच्या अधिकार्‍याच्या फिर्यादीवरुन तंबाखूची वाहतूक करणार्‍या सनि टेकचंद पंजाबी (वय-32,रा.सिंधी कॉलनी पाचोरा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रामकृष्ण पाटिल सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, तुकाराम निंबाळकर, गणेश शिरसाळे, चेतन सोनवणे, मुश पाटील , किशोर पाटिल, सचिन पाटिल असे ईच्छादेवी चौकात नाकाबंदी बंदोबस्तावर तैनात होते. 21 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास टाटा जितो या मालवाहू गाडीला (एमएच.19.सी.वाय.0089) तपासणीसाठी थांबवण्यात आले. गाडीत सव्वा लाख रुपये किमतीची तंबाखूची 13 खोके आढळून आले. पोलिसांनी हा माल खरोखर आर.के.पटेल या कंपनीचा आहे की नाही याची खात्री करण्यासाठी अमळनेरच्या तंबाखु उत्पादक कंपनीला फोन करुन घटना कळवली.

त्यानूसार आज सकाळी आर. के. पटेल अ‍ॅण्ड कंपनी टोबॅको प्रोसेसर, अमळनेर कंपनीचे मार्केटींग सुपरवायझर अशोक बाबुराव महाजन (वय 63, रा. अमळनेर) यांच्यासह कंपनीतील लोकांनी येवुन मालाची तपासणी केली असता, संबधीत माल पुर्णच्या पुर्ण बनावट, नकली असल्याचे आढळून आले. त्यानुसार कंपनीचे अशोक महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सनी टेकचंद पंजाबी रा. सिंधी कॉलनी पाचोरा याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी तंबाखू वाहतूक करणारी रिक्षा जप्त केली असून संशयित सनी पंजाबी याला अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या