Thursday, April 25, 2024
Homeनगरस्थायी समिती सभापती निवड : दुसरा दिवस निरंक

स्थायी समिती सभापती निवड : दुसरा दिवस निरंक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्थायी समिती सभापती पदाची उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय राजकीय पक्षांत या घडीला झालेला दिसत नाही.

- Advertisement -

त्यामुळे दोन दिवस उलटल्यानंतरही प्रशासनाच्या दप्तरी अर्ज वितरण व दाखलची निरंक नोंद करण्यात आली. आज आणि उद्या असे दोन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शिल्लक राहिली आहे.

स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक शुक्रवारी (दि. 25) होत आहे. समितीमध्ये सोळा सदस्य असून यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी पाच, भाजप चार आणि काँग्रेस व बसपाचा प्रत्येकी एक सदस्य आहे.

सोमवारपासून उमेदवारी अर्ज वितरण व दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी दुसर्‍या दिवशी कोणीच उमेदवारी अर्ज घेतला नसल्याची माहिती नगरसचिव एस. बी. तडवी यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या