घरातच सुरक्षित राहण्याचा संदेश

jalgaon-digital
2 Min Read

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)-

पाथर्डीत दहा दिवस जनता कर्फ्युच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासह पोलिसांनी शहरात संचलन करून शक्ती प्रदर्शन केले. सर्वांनीच घरात रहा सुरक्षित रहा असा संदेश, या निमीत्ताने देण्यात आला.

तालुक्यासह शहरात वाढत्या करोना बधित रुग्णांची संख्या लक्षात घेता गुरूवारी (दि. 6) पासून तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. शहरात व तालुक्यतील कायदा सुव्यवस्था व शांतता रहावी यासाठी शहरातून प्रशासनाने संचलन करून शक्ती प्रदर्शन केले. कडकडीत बंद पाळण्यासाठी प्रशासन सक्रीय झाले आहे. या संचालनात प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसिलदार शाम वाडकर, नायब तहसिलदार पंकज नेवसे, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, गटविकास अधिकारी शितल खिंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, नगरसेवक महेश बोरुडे, नामदेव लबडे, अनिल बोरुडे, रमेश हंडाळ, बबन बुचकुल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. तालुक्यात दररोज करोना बाधीत रुग्णासंख्येचे आलेख वाढत असल्याने प्रशासनाच्या 4 मे रोजी झालेल्या बैठकीत 10 दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

याकाळात फक्त हॉस्पिटल, मेडिकल सुरू राहणार आहे. शहरातून काढलेल्या संचलनाच्या वेळी महसूल, ग्रामविकास, आरोग्य, पोलिस, पालिका या विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी नाईक चौक, अजंठा चौक, गणेशपेठ, गांधी चौक, कसबापेठ, पोळा मारुती, वामानभाऊनगर, नाथनगर, नगररोड मार्गाने पथकाने जोरदार शक्ती प्रदर्शन करत घरातच रहा, विनाकारण फिरू नका, करोनाच्या नियमांचे पालन करा असाच संदेश यातून दिला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *