Friday, April 26, 2024
HomeUncategorized१४ हजार फूट उंचीवर शिवाजी महाराजांचा पुतळा, पाहा PHOTOS

१४ हजार फूट उंचीवर शिवाजी महाराजांचा पुतळा, पाहा PHOTOS

सर्वांना अभिमान वाटावा असे कार्य भारतीय सैन्यदलाने केले आहे. देशाच्या उत्तरी भागात जम्मू काश्‍मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची (Statue of Chhatrapati Shivaji Maharaj) प्रतिकृती स्थापित केली आहे.

ही मूर्ती १४ हजार ८०० फूट उंचावर स्थापन करण्यात आली आहे. जगात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती एवढ्या उंचीवर बसवण्यात आली आहे. समाज माध्यमांवर या मूर्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

- Advertisement -

हातात तलवार घेऊन घोड्यावर विराजमान असलेल्या शिवाजी महाराजांची ही प्रतिकृती थेट सैन्यदलातील मावळ्यांसोबत नंगा पर्वताकडे पाहत शत्रूवर नजर ठेवत असल्याचे या मुर्तीकडे पाहून वाटते.

मच्छल या गावात सैन्यदलाच्या वतीने महाराजांच्या दोन प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. या दोन्‍ही प्रतिकृती पुण्यातील २५ वर्षीय तरुण मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी साकारल्या आहेत. मच्छल बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रणय पवार यांच्या कल्पनेतून ही प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

गेल्या १४ वर्षांपासून मराठा रेजिमेंट काश्‍मीर खोऱ्यात सीमेवर तैनात आहे. शत्रूशी लढणाऱ्या या जवानांना महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये दररोज मिळत राहावे या अनुषंगाने मच्छल येथे शिवाजी महाराजांची प्रतिकृती स्थापित करण्याची कल्पना सुचली.

- Advertisment -

ताज्या बातम्या