Saturday, April 27, 2024
Homeनाशिककोचिंग क्लासेस संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

कोचिंग क्लासेस संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नाशिक ।प्रतिनिधी

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेऊन कमी संख्येने, मास्क, सॅनिटायझर, थर्मामीटर आदींचा वापर करून व सोशल डिस्टंन्सिग पाळत 15 ते 20 विद्यार्थ्यांना घेऊन शिकवणी घेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी खासगी कोचिंग क्लासेस संघटनेने केली आहे.

- Advertisement -

कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना निवेदन देत ही मागणी केली. करोना संसर्ग वाढत असून जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर निर्बंध लादले आहे. जीवनावश्यक वस्तू व सेवा वगळता इतर सर्व दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत दुकाने सुरु राहतील व शनिवार आणि रविवार बाजारपेठा बंद राहतील असे आदेश दिले आहेत.

या निर्णयाचा फटका अनेक क्षेत्रांना बसला असून कोचिंग क्लासेस चालकांना सहन करावा लागत आहे. एक- दीड महिन्यांपूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी क्लासेस सुरु करण्यास परवानगी दिली होती. पुन्हा एकदा शाळा व महाविद्यालय बंदमुळे कोचिंग क्लासेस चालकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काढलेल्या निर्बंधाच्या आदेशाला अनुसरुन शाळा व महाविद्यालयांप्रमाणेच पहिली ते नववी व अकरावीचे क्लासेस बंदच राहतील .परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून व क्लासेसचालकांचा उदरनिर्वाह चालू राहावा म्हणून आदेशात म्हटल्याप्रमाणे, दहावी बारावीचे वर्ग व स्पर्धा परीक्षा वर्ग, जसे पालकांच्या संमतीने शाळा महाविद्यालयात सुरू राहतील तसेच सर्व नियम पाळून त्यावर्गांचे क्लासेस कमी विद्यार्थी संख्येने सुरु राहू द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या