Friday, April 26, 2024
Homeजळगावप्रोटान शिक्षण संघटनेचे विविध मागण्यांसाठी निवेदन

प्रोटान शिक्षण संघटनेचे विविध मागण्यांसाठी निवेदन

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

शहरातील प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे (प्रोटान) शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आज शिक्षणाधिकारी विलास भोई यांना निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

यात जुनी पेन्शन लागू करा, ३० वर्ष सेवा आणि ५०-५५ वर्ष वय पूर्ण केलेल्या कर्मचार्‍यांना सेवेतून सक्तीने निवृत्त करण्याचे संविधान विरोधी धोरण तात्काळ रद्द करण्यात यावे, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना मिळणार्‍या ग्रॅज्युटिची मर्यादा वाढून २५ लाख रू. करण्यात यावी, महाराष्ट्रातील खाजगी संस्थामधील प्राध्यापक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचार्‍यांना केंद्राप्रमाणेच वेतन, महागाई व इतर भत्ते देणार्‍या पूर्वीच्या कायद्यात बदल करु नये आदि मागण्याचे समावेश आहे.

याप्रसंगी मिलिंद भालेराव, हेमंत देवरे, प्रशांत लवंगे, अफसर सर, सुशिल सोनवणे, दिनेश जगताप, सुदेश दराडे, विवेक पाटील, रावसाहेब जगताप, दुधमल राठोड, निखील महाले, नितीन पाटील, प्रा.राहुल केदार, जी.एम. वाघ, प्रा.चंद्रकांत ठाकरे, एम डी राजपूत,अझीझ खाटीक, वाय.पी.क्षीरसागर, सी.व्ही.ठाकरे, बी.यू. पवार, प्रवीण मोरे आदि उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या