Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानगरपालिका, नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे 28 एप्रिल रोजी राज्यभर आंदोलन; काय आहे प्रकरण ?

नगरपालिका, नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे 28 एप्रिल रोजी राज्यभर आंदोलन; काय आहे प्रकरण ?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद (municipal council) व नगरपंचायत कर्मचाऱ्यांना सहायक वेतन अनुदानाची रक्कम 27 एप्रिल पर्यंत न मिळाल्यास दिनांक 28 एप्रिल रोजी महाराष्ट्रातल्या सर्व नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी नगरपालिका समोर धरणे आंदोलन करणार आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रातील नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी यांचे वेतन (Salary) वेळेवर व्हावे म्हणुन शासनाकडुन सहायक वेतन अनुदानाची रक्कम प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत नगरपरिषदांना मिळावी म्हणून यापूर्वी संघर्ष समितीच्या माध्यमातून वेळोवेळी मागणी केली आहे.

राज्यात पुन्हा कोसळणार अवकाळीच्या सरी; या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

याबाबत दिनांक 20 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या समक्ष मंत्रालयात झालेल्या चर्चेच्या वेळी सुद्धा सहायक वेतन अनुदानाचा प्रश्न मांडण्यात आला होता.

मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना वेतन वेळेवर होण्याच्या दृष्टीने शिक्षकांसाठी राबविण्यात येणारी शालांत सेवार्थ प्रणाली राबवून सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या.

बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भात अजित पवार यांनी मांडली भूमिका; म्हणाले दंडुकेशाहीनं…

तसेच 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar) यांची जयंती होऊन सुध्दा महाराष्ट्रातील सफाई कर्मचाऱ्यांचे व इतर कर्मचा-यांना वेळेवर वेतन न मिळाल्याने सफाई कर्मचा-यांना जयंती उत्साहात साजरी करता आली नाही.

त्याबरोबरच रमजान सारखा पवित्र सण असुन सुद्धा मुस्लिम बांधवांना साजरा करता आला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्याप्रमाणात असंतोष पसरला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

या पार्श्वभूमीवर येत्या 27 एप्रिल पर्यंत सहायक वेतन अनुदानाची रक्कम महाराष्ट्रातील नगरपंचायत व नगरपालिकांना न मिळाल्यास कर्मचारी दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नगरपालिकेसमोर निदर्शने करून धरणे आंदोलन करतील. असे संघर्ष समितीच्या वतीने मुख्य निमंत्रक डॉ .डी. एल. कराड, रामगोपाल मिश्रा, डी.पी. शिंदे, सुनील वाळुंजकर, संतोष पवार यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या