Saturday, April 27, 2024
Homeराजकीयराज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये कमवा आणि शिका योजना राबविणार - उदय सामंत

राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये कमवा आणि शिका योजना राबविणार – उदय सामंत

पुणे |प्रतिनिधी| Pune

राज्यातील विद्यापीठांमध्ये (State Universities) कमवा आणि शिका ही योजना सुरू (Earn and Learn is a plan) आहे, मात्र शेतकऱ्यांची मुले, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ही योजना राज्यातील सर्व विद्यापीठात (Universities) राबविण्यात येणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी सांगितले. याबाबतचा निर्णय मार्च महिन्यातील अधिवेशनात होईल अशी माहितीही सामंत यांनी दिली.

- Advertisement -

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा (Savitribai Phule Pune University) ११९ वा पदवीदान समारंभ मर्यादित उपस्थितांमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन (Online and offline) स्वरूपात पार पडला. यावेळी उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant) बोलत होते. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ऑस्ट्रेलियन कौंसलेट जनरल पिटर ट्रसवेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, डॉ. अंजली कुरणे, डॉ. संजीव सोनवणे तसेच व्यवस्थापन मंडळाचे सदस्य व अधिसभा सदस्य उपस्थित होते.

ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२० या वर्षातील ३ हजार ८०६ विद्यार्थ्यांना पोस्टाने पदवी पाठविण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात सात पीएच.डी धारक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

सामंत म्हणाले, पुणे ही शिक्षणाची पंढरी ही ओळख जगासमोर आणण्यासाठी पुण्यात प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनी आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अन्य देशात कॅम्पस सुरू केले त्याबाबत उदय सामंत यांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.

पिटर ट्रसवेल म्हणाले, सध्या जग मोठया अनिश्चिततेतून जात आहे. परंतु ‘इनोव्हेशन’ च्या माध्यमातून वेगाने बदलणाऱ्या जगात अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मला नक्कीच खात्री आहे की हे विद्यार्थी बदलत्या काळानुसार शिक्षण घेत जगासाठी आपले योगदान देतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये २०१७ पासून ९ हजार एकत्रित संशोधने झाली आहेत. या दोन्ही देशांचे असे अनेक नैसर्गिकरित्या समान दुवे आहेत ज्यावर एकत्रित संशोधन आणि अभ्यास होऊ शकतो, असेही मत पिटर ट्रसवेल यांनी यावेळी मांडले.

यावेळी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी अहवाल सादर करत विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्यासाठी विद्यापीठाने सुरू केलेल्या अभ्यासक्रमाबरोबरच नवीन उपक्रमांचीही त्यांनी माहिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या