मंदिरं खुली…

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

ठाकरे सरकारने राज्यभरातील मंदिरं खुली करण्यास परवानगी दिल्यानंतर आता शासनाच्या निर्देशानुसार साईदर्शन

तसेच अन्य बड्या मंदिरात व्यवस्था तयार करण्यात आली आहे. तसचं 65 वर्षांवरील व्यक्तींना दर्शनासाठी बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच लहान मुलं आणि गरोदर महिलांनाही दर्शनाची परवानगी नसणार आहे. तब्बल आठ महिन्यांनंतर देव भक्तांना भेटणार आहे.

शिर्डीचं साईमंदिर, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, पुण्याच्या गणेश मंदिरासह राज्यातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुलं झालं असलं तरीही दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करावं लागणार आहे. शिर्डीत दररोज सहा हजार भाविकांना दर्शन दिलं जाईल. त्यामुळे ऑनलाईन दर्शन बुकींग असणार्‍यांनीच शिर्डीत यावं, असं आवाहन साईबाबा संस्थानकडून करण्यात आलं आहे.

विठुरायाच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग

विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करावी लागणार आहे. पंढरपुरात दररोज एक हजार भाविकांना दर्शन दिलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. नित्योपचाराचा वेळ वगळता उरलेल्या वेळेत दर एक तासाला शंभर लोकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवास देण्यात येईल असा नियम मंदिर प्रशानसनाकडून करण्यात आला आहे.

अंबाबाई देवीचे 16 तास दर्शन

तुळजाभवानी मंदिर परिसरात असलेल्या कार्यालयात मोफत पास पद्धतीची व्यवस्था करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिरात पहाटे 5 पासून रात्री 9 वाजेपर्यंत या 16 तासांच्या काळात भाविकांना दर्शन घेता येणार आहे. करोना संक्रमण टाळण्यासाठी तुळजाभवानी मंदिरात वारंवार साफसफाई, स्वच्छता व सॅनिटायझरची व्यवस्था केली जाणार असून दर 2 तासाला 500 भक्तांना मुखदर्शन दिले जाणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *