Wednesday, April 24, 2024
Homeनगरराज्यातील 102 कारखान्यांकडून एफआरपी अदा

राज्यातील 102 कारखान्यांकडून एफआरपी अदा

नेवासा| Newasa| सुखदेव फुलारी

राज्यात यावर्षी गळीत हंगाम घेतलेल्या एकूण 190 साखर कारखान्यांपैकी 102 कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाची एफआरपीची 100 टक्के रक्कम ऊस पुरवठादार शेतकर्‍यांना अदा केली आहे.

- Advertisement -

साखर आयुक्तालयाने केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, साखर संचालनालयाचे मुख्य संचालक (साखर) यांना पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे की, यंदाच्या गळीत हंगामात राज्यातील 190 साखर कारखान्यानी हंगाम घेतला. त्यापैकी आजअखेर 181 कारखान्याचे गळीत हंगाम बंद झाले आहेत.

30 एप्रिल 2021 अखेर राज्यात 997.17 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले होते. त्याची एकूण एफआरपीची रक्कम 22,293.34 कोटी रुपये होते. त्यापैकी 20,599.73 कोटी रुपये एफआरपी रक्कम शेतकर्‍यांना अदा करण्यात आलेली आहे. एफआरपी अदा करण्याचे हे प्रमाण 92.40 टक्के आहे. तसेच 1693.61 कोटी रुपयांची (7.60 टक्के) एफआरपी थकीत आहे.

राज्यातील एकूण 88 साखर कारखान्याकडे एफआरपी थकबाकी आहे तर 19 साखर कारखान्यांची एफआरपी अदा करण्याचे प्रमाण शून्य टक्के आहे. त्यांच्याविरुद्ध साखर आयुक्तालायने आरआरसीची कारवाई केलेले आहे. मागील गळीत हंगाम 2019-20 मधील गळीत उसाची 321.46 कोटींची एफआरपी रक्कम थकीत आहे.

एप्रिल अखेर 100 टक्के एफआरपी अदा केलेले जिल्ह्यातील कारखाने –

ज्ञानेश्वर, मुळा, अशोक, प्रसाद शुगर, गणेश, नागवडे (श्रीगोंदा), कोपरगाव (काळे), संगमनेर भाग, संजीवनी (कोल्हे), वृद्धेश्वर, केदारेश्वर, अंबालिका, साजन शुगर (साईकृपा-1), पियूष, श्री क्रांती शुगर.

100 टक्केपेक्षा कमी एफआरपी अदा केलेले कारखाने –

बी. बी. तनपुरे (53 टक्के), कुकडी (58), गंगामाई (84), विखे पाटील (94), जयश्रीराम (94), यूटेक (95), अगस्ती (95).

एफआरपी दिलेले राज्यातील कारखाने –

100 टक्के एफआरपी अदा- 102, 80 ते 99.99 टक्के – 39, 60 ते 79.99 टक्के – 30, 0 ते 59.99 टक्के – 19.

- Advertisment -

ताज्या बातम्या