राज्य आवास योजनेत नगर जिल्हा अव्वल

jalgaon-digital
3 Min Read

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

महा आवास अभियान 2020-21 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणमध्ये गोंदिया जिल्हा प्रथम ठरला असून धुळे दुसर्‍या आणि ठाणे जिल्हा तृतीय क्रमांकावर सर्वोत्कृष्ट ठरले आहे. त्याचबरोबर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर, रत्नागिरी जिल्हा व्दितीय क्रमांक आणि वर्धा जिल्हा तृतीय क्रमांकावर सर्वोत्कृष्ट जिल्हे ठरले आहेत. गोंदिया जिल्ह्याने सर्वात जास्त उपक्रमामध्ये पुरस्कार पटकावण्याचा मान संपादन केला आहे. राज्यात राबविण्यात आलेल्या महा आवास अभियान 2020-21 चे राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांची नावे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केली आहेत.

राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्तावाढीसाठी महा आवास अभियान 2020-21 राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या अभियानात 5 लाख पेक्षा जास्त घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत.

या अभियानामधे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना मध्ये उत्कृष्ट काम करणार्‍या संस्थाना, 10 अभियान उपक्रमांमध्ये अभियान कालावधीत केलेल्या कामाच्या टक्केवारीच्या आधारे एकत्रित गुणांकन करुन पुढीलप्रमाणे महा आवास अभियान पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

1) सर्वोत्कृष्ट विभाग : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- कोकण – प्रथम, नागपूर – द्वितीय, नाशिक – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- कोकण – प्रथम, नाशिक – द्वितीय, पुणे – तृतीय.

2) सर्वोत्कृष्ट जिल्हे : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- गोंदिया – प्रथम, धुळे – द्वितीय, ठाणे – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- अहमदनगर – प्रथम, रत्नागिरी – द्वितीय, वर्धा – तृतीय.

3) सर्वोत्कृष्ट तालुके : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- गोरेगाव (जि.गोंदिया) – प्रथम, गगनबावडा (जि.कोल्हापूर) – व्दितीय, अकोले (जि.अहमदनगर) – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- सडक अर्जुनी (जि.गोंदिया) – प्रथम, मुक्ताईनगर (जि.जळगाव)- व्दितीय, कागल (जि.कोल्हापूर) – तृतीय.

4) सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- नाव (जि.सातारा) – प्रथम, वाडोस (जि.सिंधुदुर्ग) – व्दितीय, तडेगाव (जि.गोंदिया) – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- अंबावडे (जि.पुणे) – प्रथम, अणाव (जि.सिंधुदुर्ग) – व्दितीय, बोरगाव (जि.चंद्रपूर)- तृतीय.

5) सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारती : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- करंजेपुल (जि.पुणे) – प्रथम, देर्डे कोर्‍हाळे (जि.अहमदनगर) – द्वितीय, निंभी खुर्द (जि.अकोला) – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- चिंचवली (जि.ठाणे)- प्रथम, शिरवली (जि.पुणे)- द्वितीय, अंदूरा (जि.अकोला) – तृतीय.

6) सर्वोत्कृष्ट गृहसंकुले : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- लोणी (जि.अहमदनगर)- प्रथम, येडोळा (जि.उस्मानाबाद) – द्वितीय, कणकापूर (जि.नाशिक)- तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- खारेकर्जुले (जि.अहमदनगर – प्रथम, अदासी (जि.गोंदिया)- द्वितीय, मुणगे (जि.सिंधुदुर्ग) – तृतीय.

या व्यतिरीक्त, महा आवास अभियान- 2020-21 मधील विशिष्ट 10 उपक्रमांत संख्यात्मक प्रगतीनुसार उत्कृष्ट काम करणार्‍या जिल्ह्यांना खालीलप्रमाणे महा आवास अभियान विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *