Saturday, April 27, 2024
Homeजळगावराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील उद्या जळगावात

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील उद्या जळगावात

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (State president of NCP) आ. जयंत पाटील (MLAJayant Patil) हे उद्या दि. 27 रोजी जळगाव दौर्‍यावर (Jalgaon tour) येत आहेत. या दौर्‍यात आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषद आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीसंदर्भात सकाळी 10.30 वा. बैठक घेणार आहेत.

- Advertisement -

या बैठकीला माजी आ. अरूणभाई गुजराथी, आमदार एकनाथराव खडसे, आ. अनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.सतीश पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी खा. वसंतराव मोरे, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी आ. राजीव देशमुख माजी आ. दिलीप वाघ, माजी आ. दिलीप सोनवणे, माजी आ. संतोष चौधरी, माजी आ. अरुण पाटील, माजी आ. कैलास पाटील, माजी आ. डॉ. गुरुमुख जगवाणी, माजी आ. जगदीश वळवी, माजी आ. मनीष जैन, रोहिणी खडसे, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला शहराध्यक्षा मंगला पाटील, सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत राहणार आहेत.

बैठकीत आगामी काळात होणार्‍या जि. प., प.स., न.पा. निवडणुकी संदर्भात चर्चा करणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर चर्चा करणे, आयत्या वेळी येणार्‍या विषयांवर चर्चा केली जाणार आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या