Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रआयपीएस अधिकार्‍यांना बढत्या आणि बदल्या

आयपीएस अधिकार्‍यांना बढत्या आणि बदल्या

मुंबई|Mumbai

राज्य पोलीस दलात (State Police Force) कार्यरत असलेल्या उच्च पदस्थ अधिकार्‍यांच्या (IPS) रखडलेल्या बढत्या आणि बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. गृहमंत्रालयाने काही अधिकार्‍यांना बढत्या देत राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत.

- Advertisement -

एटीएस प्रमुख सदानंद दाते आणि ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना महासंचालक पदावर बढती देत ते सध्या कार्यरत असलेले पद उन्नत करुन त्याच ठिकाणी नियुक्ती दिली आहे. तर, अपर पोलीस महासंचालक बिपिन कुमार सिंह (Bipin Kumar Singh) (आर्थिक गुन्हे महाराष्ट्र) यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. तर मनोज लोहिया यांना छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती दिली आहे.

तर सध्याचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता (Nikhil Gupta) यांच्या बदलीचे विशेष आदेश काढले जाणार आहे. तर संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यावरून निखील गुप्ता हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. तर त्यांच्यावर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गंभीर आरोप देखील केले होते. दरम्यान याचवेळी छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन (K. M. Mallikarjun) यांची देखील बदली करण्यात आली आहे.

मल्लिकार्जुन यांची मुंबई विशेष पोलीस पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी आता बृहन्मुंबई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त डी.एस. चव्हाण यांच पदोन्नती होऊन बदली करण्यात आली आहे. 

- Advertisment -

ताज्या बातम्या