Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यायेत्या गुरुवारी केंद्र सरकारविरोधात राज्यव्यापी संप

येत्या गुरुवारी केंद्र सरकारविरोधात राज्यव्यापी संप

नाशिक । प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरी विरोधी आणि देशविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी संविधान दिनी (दि.26) रोजी देशातील सर्व कामगार, शेतकरी, छोटे व्यापारी, वाहतुकदार इत्यादीनी इतर विभागासोबत एक दिवसाचा ऐतिहासिक संप पुकारण्यात आला आहे…

- Advertisement -

यासंदर्भात छाजेड यांनी काढलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले की, केंद्र सरकारने देशात कोविडमुळे निर्माण झालेल्या संकटाचा गैरफ़ायदा घेत सर्व अस्तित्वात असलेले कामगार कायदे संपुष्टात आणून चार कामगार संहिता (लेबर कोड) पारित केले. त्याचबरोबर लहान शेतकरी यांना अडचणीत आणून बड्या कॉर्पोरेट कंपन्याना फायदे होतील, व त्या कंपन्याना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुंचा काळा बाजार करण्यास संधी मिळेल असे कायदे पारित केले आहेत.

लॉकडाऊन काळात कोटयावधी कामगार व लहानमोठे उद्योजक, कारखानदार धंदे नसल्यामुळे दिवाळखोरिच्या उंबरठयावर आले. याउलट देशातील मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे मूल्य अब्जावधी रूपयांनी वाढले आहे.

आपल्या अधिकारांचे, लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी तसेच मोदी सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरी विरोधी आणि देशविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी कामगार वर्गाने सिद्ध होणे गरजेचे आहे.

दरम्यान कामगार विरोधी लेबर कोड त्वरित मागे घ्यावे, आणि पूर्वीचे सर्व कामगार कायदे पुर्नस्थापित करावे, नियमित कामात असणार्‍या कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामगार म्हणुन मान्यता द्यावी, समान कामाला समान वेतन द्यावे, नवीन पेन्शन योजना रद्द करावी, 1995 ई.पी.एफ योजनेत सुधारणा करून किमान पेन्शनची रक्कम रुपये 10000 करा.

आशा , अंगणवाडी इत्यादि योजना कर्मचार्‍यांना नियमित करून त्यांना किमान वेतन, प्रोविडेंट फंड, पेन्शनचा लाभ द्यावा, कामाचे 200 दिवस देण्यासाठी रोजगार हमी योजनेचा विस्तार करा. एका वर्षात किमान 200 दिवस काम व प्रति दिवस रुपये 600 रोज निश्चित करावा.

शहरांमध्ये रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी करावी, सरकारी अनुदान देऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करा. बेस्ट आणि एस.टी. महामंडळाचे संरक्षण करावे. सर्व असंघटित कामगारांची नोंदणी करून, त्यांना आरोग्य विमा व रुपये 3000 मासिक पेन्शन सुरु करावे इत्यादि संपात सहभागी संघटनांच्या प्रमुख मागण्या आहेत.

या संपात विविध कामगार संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष व माजी आमदार जयप्रकाश छाजेड, के. के. नायर, गोविंदराव मोहिते, महेंद्र घरत, कैलास कदम, एस. क्यु. झामा, देवराज सिंग, मुकेश तिगोटे, दिवाकर दळवी, निवृत्ती देसाई, आर.पी.भटनागर, अनिल गणाचार्य, रामवतार देवांगन, नंदाताई भोसले, तानाजी वनवे, नंदू खानविलकर, हिंदूराव पाटिल, एन. एस.पिल्ले, रविंद्र यावलकर, रामभाऊ सातव, सलाम शेख, माजी खा. गेव्ह. एम. अवारी, माधवी गायकवाड़ यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या