Saturday, April 27, 2024
Homeनगरनगरसह राज्यातील 19 केंद्रांवर रविवारी राज्य कबड्डी पंच परीक्षा

नगरसह राज्यातील 19 केंद्रांवर रविवारी राज्य कबड्डी पंच परीक्षा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्यावतीने राज्य पंच मंडळाच्या मार्गदर्शनाखाली रविवार (दि. 25) नगरसह महाराष्ट्रातील 19 केंद्रावर राज्य पंच परीक्षा घेण्यात येणार आहे. या 19 केंद्रांवर अंदाजे 800 परीक्षार्थी या परीक्षेस बसणार आहेत. यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, देवरुख- संमेश्वर, लांजा, दापोली अशी सर्वाधिक 4 केंद्रांवर परीक्षा होईल. तर अहमनगर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, सांगली, कोल्हापूर, जळगाव, धुळे, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, परभणी, पालघर या अन्य 15 केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

मिनानाथ धानजी, सतीश सूर्यवंशी, अलेक्झांडर मणी, बी. जे. पाटोळे, निवृत्ती आजगेकर, सदानंद माजलकर, रवींद्र म्हात्रे, रोहिणी अरगडे, संगीता मोरे, प्रा. नवनाथ लोखंडे, लक्ष्मण मोहिते, राजेंद्र अनुभवणे, योगेश यादव, मालोजी भोसले, नितीन कदम, भरत मुळे, सूर्यकांत कदम, सुहास पाटील, सुरेश जोशी, विनोद पाटील, संजीव मोरे, लक्ष्मण बेल्लाळे आणि शशिकांत राऊत हे पर्यवेक्षक या केंद्रांवर लेखी, तोंडी आणि मैदानी प्रात्याक्षिक परीक्षा घेतील. सकाळी 9 ते 12 या कालावधीत लेखी, त्यानंतर दुपारी थोडी विश्रांती देऊन तोंडी व मैदानी प्रात्याक्षिक परीक्षा घेण्यात येईल.

राज्य पंच मंडळाचे प्रमुख विश्वास मोरे सचिव दत्ता झिंजुर्डे यावर लक्ष ठेऊन आहेत. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसियशनचा अधिकृत परीक्षा प्रवेश अर्ज भरल्याशिवाय कोणालाही परीक्षेला बसू दिले जाणार नाही. या परीक्षेस बसलेल्या सर्व परिक्षार्थीनी दिलेल्या वेळेच्या 15 मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहाणे आवश्यक आहे, असे राज्य कबड्डी असोसियनचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या