Saturday, April 27, 2024
Homeनगरविद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती खाजगी संस्थांना देऊ नका

विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती खाजगी संस्थांना देऊ नका

संगमनेर |वार्ताहर| Sangmner

सध्या करोनाच्या प्रभावामुळे शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रिया सुरू आहे. अशा परिस्थितीत

- Advertisement -

खाजगी संस्थांना वेगळ्या प्रकारचे अ‍ॅप विक्रीसाठी विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती उपलब्ध करून दिली जात असल्याच्या तक्रारी पालकांनी शासनाकडे केल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची वैयक्तिक कोणतीही माहिती खासगी स्वरूपात व्यवसाय करणार्‍यांना उपलब्ध करून देण्यात येऊ नये. अशा प्रकारचे निर्देश शासनाच्यावतीने देण्यात आले आहेत.

सध्या ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडण्यात आलेला आहे, मात्र काही शाळा आपल्या स्तरावरून महागड्या शैक्षणिक अ‍ॅप्सचा उपयोग करीत आहेत. त्यासाठी पालकांकडून विद्यार्थ्यांची माहिती मागवून घेण्यात येते. ही बाब लक्षात घेऊन शाळांकडून अशी माहिती नोंदणीसाठी एजन्सी, खाजगी संस्था, कोचिंग संस्था, महाविद्यालय यांना पुरवण्यात येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. राज्यांप्रमाणेच केंद्रीय शिक्षा बोर्डाकडे देखील या तक्रारी करण्यात आल्या आहेत .अशा प्रकारच्या तक्रारी अत्यंत गंभीर असून राष्ट्रीय स्तरावरून वन नेशन वन प्लॅटफॉर्म अंतर्गत दीक्षा अ‍ॅप्सचा वापर करण्याविषयी सुचित करण्यात आले आहे. दीक्षा अ‍ॅपचा वापर विद्यार्थ्यांसाठी करण्यात येत असून सदरचा वापर मोफत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

प्राधिकरणाची मान्यता नसल्यास साहित्य न वापरण्याचा आदेश- कोणाच्या पासून किती राज्यात वेगळ्या प्रकारचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे तथापि ते साहित्य शैक्षणिक प्रक्रियेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या वयोगटाला,अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने, कार्यक्रमाच्या संदर्भाने योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्याचे अधिकार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे या संस्थेला देण्यात आले आहेत. शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे शैक्षणिक प्राधिकरण म्हणून संशोधन परिषदेला नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे या संस्थेच्यावतीने मान्यता दिलेले साहित्य केवळ वापरण्याची मुभा असणार आहे. असे मान्यता नसलेले साहित्य व व्यक्तिगत हितासाठी साहित्य न वापरण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

सर्व शाळा व्यवस्थापनांना असणार सक्ती- वेगवेगळ्या व्यवस्थापनाच्या व माध्यमांच्या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती कोणत्याही स्वरुपात खासगी एजन्सीला देण्यात येऊ नये, असे आदेश हे राज्यातील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांना लागू असणार आहेत.यासंदर्भात पालकांनी तक्रारी केल्यास संबंधितांवर ती शासनस्तरावरून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. करोनाच्या कालावधीत शाळा बंद असल्याने खाजगी संस्थांनी मोठ्या प्रमाणावरती डिजिटल साहित्य बाजारात उपलब्ध केले आहेत. त्याची विक्री करण्यासाठी विद्यार्थ्यांची व्यक्तिगत माहिती, दूरध्वनी क्रमांक, ईमेल पत्ता अशा स्वरूपाची माहिती या संस्था शाळांकडून परस्पर प्राप्त करत आहेत. त्यामुळे पालकांना त्रास होत असल्याचे समोर आल्याने शासनाला अखेर आदेश द्यावे लागले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या