Thursday, April 25, 2024
Homeनगरराज्य कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची स्थापना

राज्य कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची स्थापना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्नांवर कार्यरत असलेल्या राज्यातील प्रमुख संघटनांची बैठक नगरमध्ये भाकप कार्यालयात पार पडली.

- Advertisement -

राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे (आयटक) तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व संघटनांनी एकत्र येऊन राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची स्थापना केली. या कृती समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचारींच्या हक्कासाठी एकत्रितपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, भारती न्यालपेल्ली, अंबादास दौंड, कॉ. मारुती सावंत, कॉ. संजय डमाळ, एकनाथ वखरे, अशोक वाघमारे, बबन पाटील, अमृत महाजन, सुरेश निकाळजे, शरद खोडदे, शिंदे, सतीश पवार, बाळासाहेब लोखंडे, अनिल शिंदे, अनीस बागवान आदिंसह अहमदनगर, बीड, नागपूर, पुणे, वाशिम, रायगड, नाशिक, बीड, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक), महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, राज्य कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी संघटना व राज्य ग्रामपंचायत कर्मचारी श्रमिक संघ पुणे-सातारा या संघटनांचा समावेश असलेल्या राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची स्थापना करण्यात आली.

या समितीच्या अध्यक्षपदी नामदेव चव्हाण, सरचिटणीसपदी धनराज पाटील, कार्याध्यक्षपदी सुभाष तुळवे, उपाध्यक्षपदी विनोद देशमुख, मिलिंद गणविरे, सहसचिवपदी सखाराम दुरुगुडे, मंगेश म्हात्रे, श्रीकांत डापसे, खजिनदारपदी ए.बी. कुलकर्णी, प्रसिध्दी प्रमुखपदी विजय सरोवर, सदस्यपदी तानाजी ठोंबरे, राजेंद्र व्हावळ, राहुल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.

समितीच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचारींचे वाढलेले किमान वेतन, राहणीमान भत्ता, यावलकर समितीच्या शिफारशी, पेन्शन, ग्रॅच्युईटी रक्कम आदी प्रश्नावर एकसंघटितपणे आंदोलन केले जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या