Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याओबीसी आरक्षणाशिवाय धुळे-नंदुरबारसह पाच जि.प.च्या निवडणुका जाहीर

ओबीसी आरक्षणाशिवाय धुळे-नंदुरबारसह पाच जि.प.च्या निवडणुका जाहीर

नंदुरबार | प्रतिनिधी- nandurbar

न्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या 5 जिल्हा परिषद; तसेच त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी ५ ऑक्टोंबरला मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. तसेच ६ ऑक्टोंबरला मतमोजणी होणार आहे. नंदुरबार जिल्हा परीषद अंतर्गत ११ निवडणुक विभाग आणि शहादा, नंदुरबार व अक्कलकुवा पंचायत समितीच्या एकूण १४ निर्वाचक गणासाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

- Advertisement -

४९९ रुपयांत करा Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर बुक

सर्वोच्च न्यायालाने ४ मार्च २०२१ रोजीच्या निर्णयानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवर झालेल्या निवडणूका तात्काळ प्रभावाने रद्दबादल ठरवून रिक्त झालेल्या सर्व जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्याबाबत दोन आठवड्याच्या आत निवडणूक प्रक्रिया आरंभ करण्याचे आदेश आयोगाला दिले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने हा पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर केला होता. परंतु त्यानंतर ओबीसी आरक्षणावरुन ही निवडणूक होऊ शकली नाही. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका थांबवता येणार नाही, असे आदेश दिले. त्यामुळे आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

राज्य शासनाने कोविड- 19 संदर्भात ऑक्सिजन बेडच्या रुग्णांची संख्या आणि करोना पॉझिटिव्हिटी दरावर आधारित 1 ते 5 स्तर केले आहेत. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या पाच जिल्ह्यांचा स्तर- 1 मध्ये समावेश झाला आहे. पालघर जिल्ह्याचा अद्यापही स्तर-3 मध्ये समावेश आहे. त्यामुळे पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांतील रिक्त पदांच्या निवडणुका वगळता अन्य 5 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणूकांचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत ८- खापर, ९- अक्कलकुवा,२४-म्हसावद, २९-लोणखेडा, ३१- पाडळदे बु, ३५-कहाटुळ, ३८-कोळदे, ३९-खोंडामळी, ४०-कोपर्ली, ४१-रनाळा, ४२-मांडळ या ११ निवडणूक विभागासाठी आणि पंचायत समितीअंतर्गत १६-कोराई, ४९-सुलतानपूर, ५१-खेडदिगर, ५३-मंदाणे, ५८-डोंगरगांव, ५९-मोहिदे तह, ६१-जावेद तजो, ६२-पाडळदे ब्रु, ६६-शेल्टी, ७३-गुजरभवाली, ७४-पातोंडा, ७६-होळ तर्फे हवेली, ८५-नांदर्खे आणि ८७-गुजरजांभोली या १४ निर्वाचक गणासाठी पोट निवडणुक होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर अर्ज दाखल करता येणार
21 सप्टेंबर अर्जाची छाननी होणार
29 सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार
5 ऑक्टोबरला मतदान
6 ऑक्टोबरला निकाल

किती जिल्हा परिषद जागांसाठी मतदान?

धुळे – 15

नंदूरबार – 11

अकोला – 14

वाशिम -14

नागपूर -16

नेमक्या किती पंचायत समितींसाठी मतदान?

धुळे -30

नंदूरबार -14

अकोला -28

वाशिम -27

नागपूर -31

- Advertisment -

ताज्या बातम्या