Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रराज्याचे मुख्य सचिव संजयकुमार कोरोना पॉझिटीव्ह

राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार कोरोना पॉझिटीव्ह

मुंबई l Mumbai :

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे वर्क फ्रॉम होम करत असतात. त्यात आता कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने मुख्य सचिव संजय कुमार यांची भर पडली आहे.

- Advertisement -

मंत्रालयातील अनेक मंत्र्यांच्या दालनातील अधिकारी आणि मंत्र्यांनाही कोरानाची लागण झालेली असताना आता राज्याचे प्रधान सचिव संजयकुमार यांचा कोरोना पॉझिटीव्हचा अहवाल आला असून त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची खबरदारी म्हणून नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली होती.

त्यात एक जण कोरोना पॉझिटीव्ह आल्याने त्यासोबत मुख्य सचिवांनी आपली ही चाचणी करून घेतली होती. त्यात त्यांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे. मात्र सचिव कार्यालयात इतर कोणीही कोरोना पॉझिटीव्ह नसल्याचे सांगण्यात येते.

मागील काही दिवसांमध्ये मुख्य सचिवांनी मंत्रालयात विविध नियोजनासंदर्भात अनेक बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांचा अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क आला असल्याचे बोलले जात आहे. तुर्तास त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याने सध्या ते कालपासूनच आपल्या निवासस्थानी क्वारंटाईन करून घेतले आहेत.

तसेच कालपासूनच आपल्या निवासस्थानातूनच कामकाज सुरू केले असून आपली तब्येत अगदी ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागातील तब्बल डझनभराहून अधिक अधिकारी- कर्मचारी हे कोरोना पॉझिटीव्ह झाल्याचे समोर आले होते.

तर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ हे आठवड्यापूर्वी कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने त्यांची मंत्रालयातील दालनेही बंद ठेवण्यात आली आहेत.

आता राज्याचे प्रधान सचिवच कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने या कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांनाही क्वारंटाईन व्हावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या