Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रअर्थसंकल्पीय अधिवेशन पुढील दोन दिवसांत आटोपणार

अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढील दोन दिवसांत आटोपणार

मुंबई | राज्याचे सध्या सुरु असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी म्हणजे 14मार्च ला आटोपते घेण्याचा निर्णय आज संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत जाहीर केला.

गेले काही दिवस कोरोना विषाणू च्या वाढत्या उद्रेका मुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्प आणि विनियोजन विधेयक शनिवारी मंजूर केले जाईल त्यानंतर अधिवेशन आटोपते घेण्यात येईल असे अनिल परब यांनी सांगितले.

- Advertisement -

अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 फेब्रुवारीला मुंबईत सुरु झाले आणि ते 20 मार्च पर्यंत चालवणे प्रस्तावित होते. 6 मार्च ला राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला.

जनतेचे आरोग्य महत्वाचे आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधी नि मतदार संघात जाणे आवश्यक आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राज्यात कोरोना विषाणू चा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. 102 विद्यार्थी ज्यात 2जण महाराष्ट्रातील आहेत, त्यांना रोम विमानतळावर थांबवण्यात आल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वी राज चव्हाण यांनी सांगितलं, राज्य सरकार ने या बाबतीत आवश्यक ती पावलं उचलण्याची त्यांनी विनंती केली.

कोल्हापूर आणि सांगली चे 44प्रवासी इराण मध्ये अडकले आहेत, अशी माहिती ही चव्हाण यांनी दिली. भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले की,  मुंबई उपनगरातील 4प्रवासी तेहरान मध्ये अडकले आहेत. राज्य शासनाने विशेष व्यवस्था करून या अडकलेल्या प्रवाश्याना मदत करावी.

भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले कि राज्यातल्या विविध भागातून सध्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधी ना मुंबई त बोलावले जाऊ नये.

- Advertisment -

ताज्या बातम्या