Friday, April 26, 2024
Homeनाशिक९ जुलैपर्यंत सादर करा दहावीचे गुणदानपत्र; राज्य शिक्षण मंडळाच्या सूचना

९ जुलैपर्यंत सादर करा दहावीचे गुणदानपत्र; राज्य शिक्षण मंडळाच्या सूचना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा २०२१ सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीसंदर्भात सर्व माध्यमिक शाळांना (Secondary schools) विभागीय मंडळांकडे ९ जुलैपर्यंत गुणदानपत्र (Grade Certificate) सादर करण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाने (State Board of Education) केल्या आहेत…

- Advertisement -

दहावीच्या निकालासाठी (Ssc Result) विद्यार्थीनिहाय गुणांची नोंदणी करण्यासाठी मंडळामार्फत प्रथमच संगणकीय प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रणालीमध्ये विद्यार्थीनिहाय गुणांची नोंद करताना शाळा स्तरावर काही त्रुटी अथवा चुका राहिल्याची बाब मंडळाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे या त्रुटी अथवा चुकांची पडताळणी करून कार्यवाही करण्याच्या सूचना विभागीय मंडळाला राज्य मंडळाने केल्या आहेत.

नाशिक विभागीय मंडळाने सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना ७ जुलैपर्यंत सर्व दुरुस्त्यांसह कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या