Tuesday, April 23, 2024
Homeजळगावस्टेट बँकेच्या एटीएमला आता ओटीपी

स्टेट बँकेच्या एटीएमला आता ओटीपी

अमळनेर – प्रतिनिधी Amlner

स्टेट बँकच्या अेटीएम मधून रक्कम काढण्यासाठी आता दिवसा सूध्दा OTP द्यावा लागणार असल्याने ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीला काही अंशी आळा बसणार असून ग्राहाकांना फायदेशीर ठरणार आहे.

- Advertisement -

आता संपूर्ण देशात बँक स्टेट बँक ऑफ इंडिया च्या कोणत्याही ATM ला १० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी संबधीत ग्राहाकाने बँकेला दिलेल्या मोबाईल क्रमांकावर येणारा ओटीपी द्यावा लागणार आहे या सुविधेमुळे एसबीआय एटीएममधून पैसे काढणे अधिक सुरक्षित होईल.

यापूर्वी १ जानेवारी २०२० पासून स्टेट बँकेने एक नवीन नियम केला होता याअंतर्गत रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत जर तुम्ही १० हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढणार असाल तर त्यासाठी ओटीपी द्यावा लागत होता मात्र आता हा नियम दिवसा सुद्धा लागू झाला आहे म्हणजे जर तुम्ही दिवसभरामध्ये १० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम स्टेट बँकेच्या ATM मधून काढत असाल तर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर – OTP येईल आणि तो टाकल्या नंतरच तुम्हचे पैसे काढता येतील हा नवा नियम १८ सप्टेंबरपासून संपूर्ण देशात लागू झाला आहे दरम्यान हा नियम आता दिवसा पैसा काढण्यासाठी सुद्धा लागू होणार आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या