Friday, April 26, 2024
Homeधुळेदोंडाईचा : हस्ती स्कूलच्या 65 विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार

दोंडाईचा : हस्ती स्कूलच्या 65 विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार

दोंडाईचा । वि.प्र. Dondaicha

हस्ती चँरिटेबल ट्रस्ट संचलीत, हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्यु. काँलेज दोंडाईचा येथील विद्यार्थी महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाइड संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तर चतुर्थ चरण पुरस्कार निवड चाचणी परीक्षेस प्रविष्ट झाले होते.

- Advertisement -

ही परीक्षा दि.22 ते 24 फेब्रुवारी दरम्यान हस्ती बहुउद्देशिय सांस्कृतिक भवन, दोंडाईचा येथे झाली. तिचा निकाल नुकताच जाहिर झाला असून त्यात हस्तीचे एकुण 65 कब राज्य पुरस्कारासाठी पात्र ठरले. या सर्व पात्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे राज्य मुख्य आयुक्त यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र व बँज प्राप्त होणार आहे.

या विद्यार्थ्यांचा समावेश

हर्षवर्धन जाधव, कार्तिक जाधव, रूद्रप्रताप गिरासे, मनिष धनगर, विराज अहिरे, अक्षय पाटील, जयदिप परदेशी, सौरभ लाहोटी, ओम जैन, दुर्गेश खलाणे, जीत पाटील, कल्पक साळवे, हिमांशू शर्मा, सुदर्शन सोनार, गितेष सोनवणे, दक्ष सोनवणे, वैभव पाटील, दिप पाटील, कार्तिक पटेल, हर्ष महाजन, कुणाल जाधव, मोहम्मद उमर इनामदार, जनक धनगर, रोहन पाटील, ओजस पाटील, किर्तीराज पाटील, कुशाग्र पाटील, जयकांत पाटील, जय पाटिल, रूद्रराज राजपूत, सम्यक पाटील, सोहम पाटील, जय बागल, आदित्य उपाध्ये, नैतिक शर्मा, जतीन सतीजा, भोमेश संगोरे, दिप जैन, यशपाल गिरासे, पियुष देसले, नैतिक चित्ते, यशराज भदाणे, हर्षल पाटिल, आदित्य पाटील, प्रणव खलाणे, चेतन खैरनार, राजवीर राजपूत, साई पाटील, विनय भदाणे, ऋतुराज बेहरे, आदित्य ठाकरे, सुधीर राठोड, वेद जाधव, सुरज ईशी, पार्थ गोसावी, परीस गोराणे, प्रथमेश पाटील, सुमित महाजन, दिगंबर माळी, रत्नशील नगराळे, हर्षल साळवे, शुभम पाटील, रितेष पाटील, तनुज वानखेडे, वैभव ठाकरे याचा समावेश आहे.

वरील सर्व यशस्वी कब विद्यार्थ्यांना हस्ती स्कूल स्काउट गाइड विभाग प्रमुख किशोर गुरव, स्काउट मास्टर प्रविण गुरव, कब मास्टर नरेश सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. तर शालेय समिती चेअरमन कैलास जैन, सदस्य डॉ. विजय नामजोशी व प्राचार्य हरिकृष्ण निगम यांनी कौतुक केले.

हस्ती स्कूल दरवर्षी नियमितपणे स्काउट गाइडच्या विविध पुरस्कार परीक्षांना विद्यार्थ्यांना प्रविष्ट करीत असते. याद्वारा विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधला जातो.

- Advertisment -

ताज्या बातम्या