Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानियमांचे पालन करून शाळा सुरू करा : पालकमंत्री भुजबळ

नियमांचे पालन करून शाळा सुरू करा : पालकमंत्री भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शाळा Schools सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ Guardian Minister Chhagan Bhujbal यांनी दिली आहे. करोना आढावा बैठकीनंतर Corona Review Meeting झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शाळा सुरू करण्याबाबत शाळकरी मुले आणि पालक यांचेकडून मागणी होत आहे. पालकांची संमती घेऊन 1 ते 12 वी पर्यंतचे शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येत आहे तसेच जर शाळेत विद्यार्थी अथवा शालेय स्टाफ यापैकी कोणी बाधित झाले तर तात्काळ स्थानिक प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा, अशी सूचना केली.

- Advertisement -

जिल्ह्यातील लसीकरणच्या दुसऱ्या डोसबाबत बोलताना भुजबळ यांनी येत्या आठवड्यात ज्यांनी दुसरा डोस घेतलेला नाही त्यांनी तो घ्यावा, अशी विनंती केली. नागरिकांनी कोणतीही हलगर्जी करू नये. जिल्हा परिषदेमार्फत ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे त्यांनी तो घेण्यासाठी या आठवड्यात कार्यवाही करावी असे सांगितले.

जिख्यातील करोना बधितांच्या आकडेवारीबद्दल बोलताना सांगितले की, आठवड्याला दुपटीने रुग्णांची संख्या वाढत आहे. 13 जानेवारी रोजी रुग्णसंख्या आता 16 हजार इतकी झाली आहे, त्यामुळे जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये उपचार घेत असलेले रुग्ण 16 हजार जरी असले तरी हॉस्पिटलमध्ये फक्त 805 रुग्ण आहेत आणि ऑक्सिजन वर 129 तर व्हेंटिलेटरवर 20 रुग्ण आहेत.

ऑक्सिजनबाबत परिपूर्णता

दुसऱ्या लाटेत आपल्याला 137 मे टन एवढा ऑक्सिजन लागला होता; आता आपण 335 मे टन ऑक्सिजन भरून ठेवला आहे. याशिवाय 47 ठिकाणी ऑक्सिजन कोंसेंट्रेटर ठेवले आहे त्यांचा वापर सुरू करण्याबाबत निर्णय डॉक्टर घेतील.

मृतांच्या वारसांना या आठवड्यात मदत

करोनामुळे मृत झालेल्यांच्या वारसांना आपण 50 हजार मदत करतो त्यात 12 हजार 978 अर्ज प्राप्त आहेत. पैकी 7980 मंजूर झाले आहेत. बाकीचे 2115 तूर्तास फेर तपासणी होऊन एक आठवड्यात काम पूर्ण होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या