Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यामुद्रांक विभाग सक्षमीकरणाच्या दिशेने

मुद्रांक विभाग सक्षमीकरणाच्या दिशेने

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शासनाच्या महसूलात मोठ्या प्रमाणात भर टाकण्याचे काम मुद्रांक विभाग करीत असतो.मात्र या विभागाचा कामातील ढिसाळपणा नागरिकांचा अंत पाहणारा ठरु लागला आहे.यातून मार्ग काढण्याच्या दृष्टीने प्रशासनाने या विभागाला ‘हायटेक’ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सूतोवाच करताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी 3500 कोटींचा निधी आरक्षित केल्याचे सांगितले.

- Advertisement -

ग्राहक महसूल देतात म्हणून त्यांना शासनाच्या माध्यमातून अद्ययावत सुविधा देणे गरजेचे असून, त्यासाठी ठेकेदारांना पाचारण करण्यात आले आहे. टेंडरच्या माध्यमातून प्रस्ताव मागवण्यात आलेले असून लवकरच मुद्रांक विभाग हायटेक होईल,असे विखे पाटील यांनी सांगितले.

आर्थिक अथवा स्थावर मालमत्तेच्या व्यवहाराची नोंदणी करण्यासाठी मुद्रांक विभाग हा अत्यावश्यक दुवा आहे.या माध्यमातून व्यवहाराची विश्वासार्हता नोंदित होत असते.ही ग्राहकांसाठीही महत्वाची नोंद असल्याने विलंब लागत असला तरी दोन्ही पक्षकार कळ सोसत असले तरी कागदपत्रांच्या नोंदणी कामात होणारा विलंब हा खरेदीदार सोबतच विक्रेत्यांनाही तापदायक होऊ लागला आहे.मात्र ही नोंदणी अत्यावश्यक असल्याने कालापव्यय होत असतानाही तासन्तास त्यासाठी थांबून रहाण्याशिवाय पर्याय नसल्याने दोघेही मुकाटपणे त्रास सहन करीत आले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी क्रेडाई नाशिक सिटीच्या पदग्रहण सोहळ्यामध्ये मुद्रांक विभाग हायटेक करण्याचे सुतोवाच केले होते. त्यासाठीची टेंडरिंग प्रक्रिया ही पूर्ण झाली असल्याचे सांगून लवकरच कामाचे आदेश निघतील असेही स्पष्ट केले.मुद्रांक विभागाच्या पायाभूत सुविधा या सुमार दर्जाच्या असल्याने नागरिकांना ताटकळत राहावे लागते. या सुविधांमध्येही विकास होण्याची गरज असल्याची भावना ग्राहक व्यक्त करीत आहेत.

नेहमीच सर्व्हर डाऊन

सध्या बांधकाम व्यवसायिकांना भेडसावणार्‍या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने मुद्रांक विभागाच्या सर्व्हर सक्षम करण्याची बाब पुढे आली आहे. सर्व्हरची क्षमता कमी असल्याने नेहमीच सर्व्हर डाऊन असल्याची तक्रारी येत असल्यामुळे आपोआपच विलंबाने नोंदणी होत असल्याने सातत्याने नागरिकांसह बांधकाम व्यवसायिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. हल्ली बर्‍याच प्रमाणात ऑनलाइन प्रक्रिया सुरू झालेली असल्याने कागदपत्रांची पूर्तता ऑनलाइन पद्धतीने केलेली असल्याने नोंदणीसाठी लागणारा कालावधी कमी करण्यासाठी सर्व्हरचे सक्षमीकरण करणे मदतगार ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या