Thursday, April 25, 2024
Homeनाशिकअनेक आरोग्य केंद्रात कर्मचारी गैरहजर

अनेक आरोग्य केंद्रात कर्मचारी गैरहजर

जानोरी । Janori (वार्ताहर)

वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवक हजर नसल्याबाबत अनेकदा तक्रारी येतात, परंतु सुधारणा काही होतच नाही, अशीच परिस्थिती आज दिसत आहे.

- Advertisement -

सेवकांंबरोबर अधिकारीही हजर नसतांना याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे खद्द जिल्हा परिषद सदस्यांनाच देत असल्याने संतप्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यांनी चांगलेच धारेवर धरत गैरहजर असलेल्या अधिकारी व सेवकांची बिनपगारी रजा करत कारवाई करण्याचे आदेश वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश पाटील यांना दिले.

वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत असलेल्या मातेरवाडी, राजापूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यांनी भेट दिली असता तेथे सेवकच हजर नसल्याचे चित्र दिसले.

सध्या करोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे आरोग्य विभागाने कार्यरत असणे आवश्यक असतांना राज्यातील यंत्रणा डोळ्यात तेल घालून आरोग्याबाबत आवश्यक ती काळजी घेत असताना वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या उपकेंद्रामध्ये होत असलेल्या हलगर्जीपणाचे चित्र जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यांनाच अनुभव आल्यामुळे त्यांनी एकच संताप व्यक्त केला.

संबंधित समुदाय आरोग्य अधिकारी यांना विचारणा केली असता धूलिवंदनाच्या उत्सवाचे कारण देत त्यांनी आले नसल्याबाबत खुलासा केला हे एक आश्चर्यच. अवघे राज्य करोनासदृश परिस्थितीमुळे सर्व यंत्रणा कामाला लागले असताना हे अधिकारी मात्र सण उत्सव साजरे करत फिरतात हे नक्कीच आश्चर्याची बाब आहे.

बाब जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांना कळवत दांडी बहादूर सेवक व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना केल्या.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पाटील हे तत्काळ उपकेंद्रात हजर झाले असता त्यांच्याही प्रकार लक्षात आणून देऊन संबंधित सेवक व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना केल्या.

सध्या करोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. राज्यातील सर्व यंत्रणा करोनाला थोपविण्यासाठी सज्ज झाली असतांनाच येथील आरोग्य सेवक व काही अधिकारी मात्र सण उत्सवाच्या नावाखाली दांड्या मारतात हे नक्कीच खेदजनक बाब आहे. हे असले प्रकार आम्ही चालू देणार नाही. प्रत्येकाने आपले कर्तव्य चोख पणे बजवून आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहावे अन्यथा कारवाईसाठी सामोरे जावे.

भास्कर भगरे, जि. प. सदस्य

- Advertisment -

ताज्या बातम्या