२९० कर्मचारी निलंबीत; कारवाई होताच ७७ कामावर, ११० गाड्या सुरू

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी)

राज्य सरकारच्या परिवहन विभागाने वेळोवेळी आदेश देऊनही आतापर्यंत कामावर हजर न झालेल्या २९० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

कारवाई केल्यानंतर यातील ७७ कर्मचारी कामावर हजर झाले असून जिल्ह्यात शुक्रवारी ११० एसटीच्या बसेस धावल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

दरम्यान, शुक्रवारपर्यंत कामावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला असून येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील किती २९० कर्मचारी निलंबीत कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल, याची आकडेवारी समोर येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

आधी अखेरची मुदत देऊनही कामावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावूनही तुम्हाला कामावरून बडतर्फ का करण्यात येऊ नये, याबाबतचा खुलासा घेण्यात येणार आहे. त्यानंतर थेट कारवाई करण्यात येणार आहे.

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचे ब्रेकअप; पण…

शुक्रवारी नगरच्या तारकपूर, शेवगाव, नेवासा आणि कोपरगाव आगारातून काही बसेसची वाहतूक सुरू झाली असून दिवसभरात ११० बसेस रस्त्यावर धावत असल्याची माहिती एसटी प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

‘या’ ड्रामा क्वीनची Bigg Boss च्या घरातून एक्झिट

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *