Thursday, April 25, 2024
Homeनाशिकआता 'एसटी’ महामंडळाच्या तक्रारी मोबाइलवर

आता ‘एसटी’ महामंडळाच्या तक्रारी मोबाइलवर

नाशिक | Nashik

प्रवासी, वाहनचालक यांच्या तक्रारींचा निपटारा त्वरित व्हावा व या कामात सुसूत्रता यावी यासाठी मोबाइल अ‍ॅपची सुविधा परिवहन विभागाकडून आणली जाणार आहे. ही सुविधा एका महिन्यात सुरु केली जाणार असल्याचे कळते.

- Advertisement -

रिक्षा, टॅक्सी, मोबाइल अ‍ॅप आधारित टॅक्सी, खासगी प्रवासी बसमधून प्रवास करताना अनेकांना जादा भाडे घेणे, भाडे नाकारणे, प्रवाशांशी विनाकारण हुज्जत घालणे इत्यादी प्रकार वाहन चालकांकडून घडतात.

त्यामुळे तक्रारी करण्यासाठी प्रवासी प्रथम वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क साधतात. मात्र आरटीओकडे तशी सुविधा नाही. एखादी तक्रार करायची असल्यास परिवहनच्या ईमेलवर तक्रार करावी लागते.

अशा अनेक तक्रारी मेलवर येतात व त्याचा योग्य पद्धतीने निपटारा होत नाही. त्यामुळे परिवहन विभागाने मोबाइल अ‍ॅप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१७ मध्ये मोबाइल अ‍ॅपची सुविधा होती.

मात्र तांत्रिक अडचणींमुळे ती बंद झाली. तीच सेवा सुधारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अ‍ॅपमध्ये विविध सेवांविषयी माहिती देतानाच तक्रारी व समस्यांचा निपटारा करण्यात येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या