Wednesday, April 24, 2024
Homeनगरएसटी स्मार्टकार्डसाठी 30 जून अंतिम मुदत

एसटी स्मार्टकार्डसाठी 30 जून अंतिम मुदत

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

महाराष्ट्र राज परिवहन महामंडळाने जेष्ठ नागरिकांना कमी दरात प्रवास करण्यासाठी सुरू केलेल्या स्मार्टकार्ड योजणेसाठी 30 जुनपर्यत शेवटची मुदत दिली आहे. त्यानंतर इतर ओळखपत्रावर दिला जाणारा सवलतीत प्रवास बंद होणार आहे. यामुळे लवकरात लवकर स्मार्टकार्ड घेण्याचे आवाहन पारनेर एस टी बस डेपोचे व्यावस्थापक भोपळे यांनी केले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने यापुर्वी जेष्ठ नागरिकासाठी स्मार्टकार्ड प्राप्त करून घेण्याची सुरवातीची मुदत 31 मेे पर्यत देण्यात आली होती .परंतु कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसेच राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्‍यांनी दि 28 ऑक्टोबर 2021 पासुन पुकारलेल्या संपामुळे आगार तसेच विभागीय कार्यालयात स्मार्टकार्ड नोंदणीकरण व वितरण होऊ शकली नव्हते. यामुळे योजनेला मुुदत वाढ देण्यात ओली होती.

1 जुलै पासुन सध्या प्रचलित असलेली ओळखपत्र प्रवासाकरीता ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. तेव्हा जेष्ठ नागरिक व सवलतीत प्रवास करणार्‍या नागरिकांनी 30 जुन पर्यत आपले स्मार्टकार्ड काढावे त्याशिवाय इतर ओळखपत्रावर प्रवास करता येणार नाही असे एसटी महामंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या