Wednesday, April 24, 2024
Homeनगरसेंट लुक हॉस्पिटलला 15 लाखांचा कोव्हिड निधी मंजूर

सेंट लुक हॉस्पिटलला 15 लाखांचा कोव्हिड निधी मंजूर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

डी.पी.डी.सी. मधून जिल्हाधिकारी यांच्याकडून 15 लाख रुपये सेंट लुक कोव्हिड सेंंटरकरिता मंजूर करून घेण्यात आलेले

- Advertisement -

असून सेंट लूक हॉस्पिटलला 73 हजार रुपये व 3 लाख रुपये असे दोन धनादेश देण्यात आले आहेत, तरी आमदार लहु कानडे यांनी आज 2 ऑक्टोबर रोजी उपोषण करू नये, अशी विनंती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आ. कानडे यांना पत्राद्वारे केली आहे, अशी माहिती आ. कानडे यांनी दिली.

यापत्रात तहसीलदार यांनी म्हटले आहे की, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून एनएचआरएलमधून प्राप्त झालेल्या निधीपैकी प्राप्त झालेल्या देयकापैकी देय असलेली व उपलब्ध असलेली 73,700 रुपयांचा दि. 30 सप्टेबर 2020 रोजीचा धनादेश क्र. 259905 सेंट लुक हॉस्पिटल यांना पाठविण्यात आलेला आहे.

तसेच काल दि. 01 ऑक्टोबर 2020 रोजी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून नियमानुसार देय असलेल्या निधीपैकी 3 लाख रुपये या कार्यालयाकडे वर्ग करून घेत, काल सेंट लुक हॉस्पिटल यांना धनादेश क्र. 260007 अन्वये 3 लाख रुपये अदा करण्यात आलेले आहेत.

उर्वरित देयके संत लुक हॉस्पिटलमधील स्टाफ कोव्हिड – 19 ची बाधा झाल्याने व त्यापैकी एका सिस्टर्सचा करोनामुळे मृत्यू झाल्याने डी.सी.एच.सी. सेंट लुकचे प्रशासन देयके सादर करू शकलेले नाहीत. उर्वरित रकमेचे देयके प्राप्त झाल्यानंतर त्यांना तात्काळ सदरची उर्वरित रक्कम वितरीत करण्यात येईल. यास्तव आपण दि. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी उपोषण करू नये, अशी विनंती तहसीलदारांनी आ. कानडे यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या