Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप; विलीनीकरणाच्या मागणीवरून एसटीत काम बंदची हाक

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप; विलीनीकरणाच्या मागणीवरून एसटीत काम बंदची हाक

मुंबई | Mumbai

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्यावर्षी केलेल्या संपातील अनेक मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. विलिनीकरण, सातवा वेतन आयोग, शिस्त आवेदन पद्धती अशा विविध मागण्यांसाठी एसटी कष्टकरी जनसंघाने पुन्हा एकदा ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यात कामबंद आंदोलनाची नोटीस जनसंघाच्या अध्यक्ष ॲड.जयश्री पाटील यांनी एसटी महामंडळ प्रशासनाला दिली आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर होते, तेव्हाही एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ६ महिने एसटी संप केला होता. यात सरकारने काही मागण्या मान्य केल्या होत्या. दरम्यान, आता पुन्हा एकदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी संपावर जाणार आहेत.

एसटी महामंडळातील सुमारे ८५ टक्के बस नादुरुस्त असल्याने रस्त्यावर चालण्यास अयोग्य आहेत. अनेक गाड्यांचे इन्शुरन्स नाहीत, त्यामुळे गाड्या रस्त्यावर चालविणे धोक्याचे असून ते प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे, असे सदावर्ते यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

२०२१ मध्ये जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांनी ५४ दिवसांचा संप पुकारला होता, तेव्हा सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा दिला होता. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना सुरू करत त्यांनी या लढ्यामध्ये उत्स्फुर्तपणे उडी घेतली. त्यामुळे आता सदावर्ते यांनी या संपामध्ये ६८ हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे.

तेलंगाना राज्य सरकारच्या धर्तीवर एसटीचे शासनात विलनीकरण करावे, शासनानातील कर्मचाऱ्यांप्रमाणे ४२टक्के महागाई भत्ता एसटी कर्मचाऱ्यांना थकबाकीसह मिळावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, शिस्त व आवेदन पध्दत ताबडतोब रदद करावी, इलेक्ट्रीक बसच्या करारामध्ये खासगी चालक वापरण्याचे कंत्राट ताबडतोब रदद करावे, दिवाळी करिता एक पगार बोनस द्यावा, सेवानिवृत्त कर्मचान्यांना ३५०० ऐवजी कमीतकमी १८ हजार पेन्शन द्यावी यासह अनेक मागण्या कष्टकरी जनसंघाचे केल्या आहे.

सुषमा अंधारेंचा निशाणा

“संबंध महाराष्ट्रात मराठा आरक्षणादरम्यान गुणरत्न सदावर्ते हे फडणवीसांचा माणूस, फडणवीसांचा बोलका बाहुला आहे, असं वातावरण तयार झाले. मी फडणवीसांचा माणूस नाही किंवा फडणवीसांशी तसा अर्था अर्थी संबंध नाही, हे सांगण्याचा भाबडा प्रयत्न म्हणून सदावर्ते फडवीस सरकारमध्ये असताना आंदोलन करत आहेत. परंतु, लोक अशा भ्रामकतेला फसणार नाहीत, हेही तितकेच खरे”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. म्हणजे, गुणरत्न सदावर्ते यांनी पुकारलेला संप ही राजकीय खेळी असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या